CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित , छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- दि. ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे. दि.१ जानेवारी, दि. १ एप्रिल, दि. १ जुलै आणि दि. १ ऑक्टोबर, २०2३ रोजी ज्या नागरिकांचे वय वर्षे अठरा पूर्ण असेल त्यांना दि. १७ ऑक्टोबर, २०२३ ते दि. ३० नोव्हेंबर, २०२३ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

निवडणुका न्याय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते.दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदारयादी प्रकाशित केली जाईल. शाळा / महाविद्यालयातील संभाव्य मतदारांची मतदार नोंदणी होणार असल्याने १७ वर्षावरील व १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक / युवतींची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटना, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने शाळा व महाविद्यालयांमधील मुख्याध्यापक व प्राध्यापक यांनी आपल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीसाठी युवक व युवतींचे प्रबोधन करून जास्तीत जास्त युवा मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे २८ हजार ३४६ इतक्या गृहनिर्माण सोसायट्या नोंदणीकृत आहेत. या सोसायट्यांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वास्तव्यास असून त्यांची १०० % नोंदणी होणे आवश्यक आहे. आपल्या सोसायटीमधील प्रत्येक पात्र व्यक्तीची नोंद मतदारयादी मध्ये व्हावी, यासाठी या कार्यालयाने “गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी विशेष अभियान” राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व इतर कर्मचारी हे दि. २९ जुलै २०2३ (शनिवार), दि.३० जुलै २०२३ रविवार, दि. ०५ ऑगस्ट २०२३ व दि. ०६ ऑगस्ट २०2३ रोजी घरोघरी भेटी देणार आहेत. याकरिता प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष आणि चेअरमन हे पदसिद्ध मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (BLV) असल्याने त्यांनी या राष्ट्रीय कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अशोक शिनगारे (भा.प्र.से.) व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम यांनी केले आहे.