CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वर्षावासाचे" औचित्य साधून "तथागतांचे निरुपण" रंगभुमीवर...

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

मुंबई : वर्षावास म्हणजे ऐन पावसाळा ! आषाढ ते अश्विन महिन्यापर्यंत गुरु-शिष्यांच्या सहवासात होणारे विविध सांप्रदायांचे ग्रंथ वाचन !
आजपर्यंत ग्रंथ वाचनाचे असे सर्व कार्यक्रम हे पारायण म्हणून मंदिरे, बुध्दविहारे किंवा त्या त्या परिसरात होतात. प्रबोधनांच्या ह्या कार्यक्रमांना शिक्षित पिढी येत नाही, अशी खंत आयोजक व्यक्त करतात. पण तसं नाहीय ! आवड असलेला कोणताही आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी आता शाळा - महाविद्यालयातील नवी पिढी येऊ लागलेय. म्हणूनच, "संयुक्त माझगाव सामाजिक विकास संघटना, मुंबई" ही सामाजिक संघटना व "विचारवंत ओबीसी समुदाय" तसेच स्मित-हरी प्रॉडक्शनच्या सहयोगाने "तथागतांचे निरुपण" हा संगीतमय आधुनिक प्रयोग रवि.दि.२ जुलै रोजी सकाळी ११ वा. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, राणीबाग भायखळा, येथे सादर करीत आहेत.


ह्या वर्षावास प्रारंभासाठी, भारतीय बौध्द महासभा व बौध्दजन पंचायत समितीआणि ओबीसी संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी, गटप्रमुख, शाखाध्यक्ष, सभासद, बौध्दाचार्य, उपासक, उपासिकांच्या परिवारासह, श्रेष्ठ साहित्यिक पत्रकार आयु. गुणाजी काजिर्डेकर साहेब, आदरणीय प्राध्यापक डॉ. विष्णू भंडारेसर राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी (सिध्दार्थ महाविद्यालय), प्राध्यापक डॉ. सुनील रामटेकेसर, मराठी विभाग प्रमुख (दामोदर नाथाबाई ठाकरसी महीला विद्यापीठ चर्चगेट), प्राध्यापक योगेश चिकटगांवकर लोककला अभ्यासक (मुंबई विद्यापीठ), यांच्या समवेत, हा "वर्षावास प्रारंभ सोहळा" संपन्न करण्याचा निर्धार आहे.


परिवारासह आपली उपस्थिती वंदनीय आहे. आपण सहपरिवार अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन स्मित-हरी प्रॉडक्शन चे निर्माते हरी पाटणकर, कोकणातील "विचारवंत ओबीसी समुदाय" आणि "संयुक्त माझगाव बौद्ध विकास तथा सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष आयु. यशवंत ओव्हाळ,सुरेश कांबळे व समस्त कार्यकारिणी" करीत आहे.