CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वन विभागाच्या हद्दीत गांजाची लागवड रोखण्यासाठी वन विभागाने नियमित तपासणी करावी - अति. पोलीस अधिक्षक डॉ. रुपाली धाटे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे, : - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गाजांची लागवड रोखण्यासाठी वन विभागाने लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. यासंदर्भात संशयास्पद आढळल्यास संबंधित विभागांशी समन्वय साधून कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली धाटे यांनी दिले. तसेच अंमली पदार्थ सेवन रोखण्यासंदर्भात सर्व विभागांनी जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज डॉ. धाटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक शाम भालेराव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक चारुदत्त हांडे, वन विभागाच्या प्रियंका हिरे, अन्न व औषध प्रशासनचे कैलाश खापेकर, भिवंडी उपविभागीय कार्यालयाचे सी.एस. राजपूत, मोतीराम भोये, डॉ. विजय साळुंखे, बी. के. शेळके, जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉ. स्वाती पाटील, टपाल विभागाच्या अमिता कुमारी, मधुकर घोरड आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सतर्क रहावे. ग्रामीण भागातील रासायनिक कंपन्या, बंद पडलेल्या कंपन्या, गोदामे आदी ठिकाणांची संयुक्त तपासणीसाठी गट स्थापन केला आहे. या गटाने नियमित तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच आरोग्य, शिक्षण विभागाने अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना डॉ. धाटे यांनी यावेळी दिल्या.