CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीकरांनो सावधान वाहतूक पोलीसांकडून ई-चलान द्वारे दंड - वपोनि.उमेश गित्ते

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली :- डोंबिवलीकर आतापर्यंत बिनधास्तपणे आपल्या टू व्हीलर व फोर व्हीलर चालवत होते चौका चौकात डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वार्डन असतात. ते कर्तव्य बजावत असताना बऱ्याच वेळा वाहनचालकांची व त्यांच्यामध्ये नियम मोडल्यानंतर वाद व्हायचे परंतु आता ई-चलान द्वारे दंड आकारणी केली जातणार आहे . कल्याण डोंबिवली मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सर्वसाधारणपणे वर्षभरापासून शहरांमधील मुख्य चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे . या सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत.पोलीस सिग्नल मोडून जाणाऱ्या वर कारवाई करीत त्याला समज देऊन नियमाप्रमाणे चालण्या सांगत असत परंतु वाहन चालकांमध्ये जनजागृती नसल्याने व पोलीस आपले काही करत नाही असा समज झाल्याने सिग्नल मोडणाऱ्यांची संख्या मोठी झाली .

या संदर्भात जनजागृती करण्यासाठी डोंबिवली विभागाचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह व विविध संस्थांच्या प्रमुखासह जनजागृती केली व चौका चौकात फलक लावले असून नागरिकांना त्यांनी आवाहन केले आहे की ,आपण आपले वाहन नियमानुसार चालवावे ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणा नसेल तेव्हा असे समजू नये की या ठिकाणी पोलीस नाहीत परंतु त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत व हे सर्व कल्याणच्या सेंटरमधून सर्व ठिकाणावर लक्ष ठेवून असतील व आमचे अधिकारी व व कर्मचारी तात्काळ नियम मोडणाऱ्या वर ते कारवाई करतील असे वपोनि.उमेश गित्ते यांनी सांगितले .