CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, :- केंद्रपुरस्कृत बाबू जगजीवनराम छात्रावास योजने अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडेतत्वावर घेणेसाठी इच्छुक इमारत मालकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत सन २०२३-२४ मध्ये ठाणे जिल्ह्यात ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बाबू जगजीवनराम योजने अंतर्गत १०० मुलांकरिता व १०० मुलींकरिता शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. त्याकरिता वसतिगृहांसाठी ठाणे शहर परिसरामध्ये विद्यार्थी / विद्यार्थीनीसाठी नमूद परिसरातील इमारत मालक/बांधकाम विकासकाकडून अटी व शर्तीच्या अधिन राहून अर्ज/निविदा मागविण्यात येत आहेत.संबंधित इमारत ठाणे परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ १०,००० चौ. फुट असावे. सदर इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह व १० स्नानगृहाची सुविधा असावी. सदर इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा. इमारतीचे भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरविल्यानुसार इमारत मालक देण्यास तयार असलेबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील.
इच्छुक इमारत मालक / बांधकाम विकासक यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, ५ वा मजला, जिल्हाधिकारी इमारत, कोर्ट नाका, ठाणे (प) या कार्यालयाकडे लेखी स्वरुपात अर्ज करावेत, असे सहायक आयुक्त श्री. इंगळे यांनी कळविले आहे.