CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलतर्फे कल्याणमधील पहिल्या अत्याधुनिक नेत्र रुग्णालयाचे उदघाटन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष रवि पाटील यांच्या हस्ते कल्याणमधील डॉ. अग्रवाल सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटलचे उदघाटन

कल्याण : नेत्रउपचारांच्या क्षेत्रांत 1957 सालापासून कार्यरत असलेल्या डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलतर्फे कल्याणमधील त्यांच्या अत्याधुनिक नेत्रउपचार रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि शहराध्यक्ष रवि मोरे यांची उदघाटन समारंभाला उपस्थिती होती. तसेच डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे सीओओ राहुल अग्रवाल आणि क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रादेशिक प्रमुख तसेच डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर डॉ. वंदना जैन हे देखील सोहळ्याला उपस्थित होते. या उदघाटनासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यानी त्यांचा शुभसंदेश पाठवला, त्यात ते म्हणाले की, कल्याणमध्ये अत्याधुनिक सुविधा नागरिकांना आता मिळणार आहे. उच्च दर्जाची आणि परवडणारी सेवा देणारे हे रुग्णालय कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी एक आदर्श रुग्णालय असेल. असा मला पूर्ण विश्वास आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे व शहरप्रमुख रवि पाटील यांनी देखील हॉस्पीटलला शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे सीओओ श्री. राहुल अग्रवाल म्हणाले, की “अगदी घराच्या जवळ डोळ्यांची आरोग्यसेवा आणून डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्सने कल्याणमध्ये अभिमानाने आपले दरवाजे उघडले आहेत. हा महत्त्वाचा उपक्रम या परिसराला सशक्त बनविणार आहे. आता डोळ्यांच्या इलाजासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही.

सध्या, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्स महाराष्ट्रातील 16 रुग्णालये चालवत आहेत. ज्यात मुंबईतील 6, पुण्यातील 7, नाशिकमध्ये 2 आणि सातारा येथे 1 रुग्णालयाचा समावेश आहे. कल्याणमधील डॉ. अग्रवाल यांचे महाराष्ट्रातील 17 वे रुग्णालय आहे.