CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
मीरा भाईंदर : वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अवैद्य धंद्यावर प्रभावीपणे कारवाई करून पायबंद करणे बाबत वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांना दि. २ जून २०२३ रोजी पाच वाजेच्या सुमारास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विरार पूर्व , वासू पाटील यांच्या शेतात पापडखिंडी देवीपाडा येथे बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू तयार होत आहे .मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ३ , विरारचे अधिकारी व अंमलदार यांनी वर नमूद ठिकाणी छापा टाकून १) अल्युमिनियम धातूचा टाव , नळी असलेले चाटू ,२) २०० लिटर क्षमतेचे १० निळ्या रंगाचे प्लॉटीचे ड्रम तसेच २० लिटर क्षमतेचे सफेद रंगाचे १० प्लास्टिकचे कॅन त्यात एकूण २२०० लिटर नवसागर गुळ मिश्रित वॉश , ३) २० लिटर क्षमतेचे दोन सफेद रंगाचे प्लास्टिकचे कॅन त्यात २० लिटर गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू असा एकूण ०१,०९०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून शांताराम रघुनाथ गांगडे , चिंबीपाडा, तिल्हेर रोड, ता. भिवंडी, जि ठाणे याच्या विरुद्ध पो.अंमलदार सुनील बाळासाहेब पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ,५३१/ २०२३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ब) (क) (ड) (फ) (ई) अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) ,अविनाश अंबुरे, एसीपी (गुन्हे)अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ , विरारचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पो. उप.निरी. शिवाजी खाडे, उमेश भागवत , पो. हवा. अशोक पाटील ,मनोज चव्हाण, सचिन घेरे, सागर बारावकर ,मनोज सकपाळ ,अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमित जाधव , म. सु .ब.प्रवीण वानखेडे , सागर सोनवणे ,गणेश यादव यांनी केली.