CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
राजेंद्र वखरे
ठाणे : - गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तरुण तरुणी कामी श्रमात जास्त पैसा मिळेल ,याकडे लक्ष केंद्रित करतांना दिसत आहे. परंतु जे बुद्धीवंत आहेत ते आपल्या बुद्धीच्या जोरावर आपले स्थान निर्माण करीत असतात. पण आज काही तरुण असे आहेत की, ते अनैतिक मार्गाचा अवलंब करून यश आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी धडपडताना दिसतात परंतु हे करत असतांना ते विसरतात की, कायदा व कायद्याचे रक्षक हे त्यांचे काम चोख बजावत असतात.परंतु काही उदाहरणं ऐकून व बघून आश्चर्याचा धक्काच बसतो जे काही तरुण तरुणी कायदा व कायद्याचे रक्षक असलेल्या खात्यात येण्यासाठीच कायदा हातात घेऊन कायद्याची मोडतोड करून पोलीस खात्यात येण्यासाठी वाटेल तो मार्ग अवलंबताना दिसत आहे. अशाच प्रकारे नुकत्याच पोलीस भरतीमध्ये नशीब आजमावणाऱ्या तरुणांने दुसऱ्या एका तरुणास पैसे देऊन त्याच्या जागेवर लेखी परीक्षा देण्यासाठी एका तरुणाला पैसे दिले आणि तो तरुण सुद्धा पैशाच्या मोहापायी डमी विद्यार्थी म्हणून परीक्षेत बसण्यासाठी आला परंतु त्याचे पितळ उघडे पडले.अलीकडे महाराष्ट्र शासनाने विविध खात्यामध्ये तरुण-तरुणींची भरती करण्याचे सुरू केली आहे .त्यातल्या त्यात पोलीस खात्यात भरती होण्यासाठी नवतरुण व तरुणांचा ओढा वाढत असल्याचे दिसत आहे, परंतु जागा कमी व उमेदवार जास्त असल्याने स्पर्धा अधिकच वाढलेली असल्याने आपण पोलीस खात्यात जावे यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहे .यात जे बुद्धिवंत व शारीरिक मेहनतीवर सर्व अडथळे पार करून नियमाप्रमाणे पोलीस खात्यात भरती होण्यासाठी तयारी करताना दिसतो.मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई २०२१ पदाची भरती प्रक्रिया चालू असताना ठाणे पोलीस आयुक्तालयातंर्गत विविध केंद्रावर मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.त्यापैकीच केंद्र क्रमांक ९ सरस्वती विद्यालय राबोडी ठाणे पश्चिम या ठिकाणी सुद्धा लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या केंद्रावर प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विलास तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सुधाकर खाडे तसेच मेन गेट जवळ इतर अंमलदार मपोशि.माया गोरक मोरे,पोलीस हवालदार सरनाईक पोलीस शिपाई सुनील केंगले ,पोलीस शिपाई आर .एस .डावेकर ,महिला पोलीस शिपाई वनिता पाटील ,पोलीस शिपाई रवी पावडे ,पोलीस शिपाई आदिनाथ इंगोले महिला पोलीस शिपाई एस. एस. गावित, महिला पोलीस अमलदार अर्चना शेळके आणि पोलिस हवालदार ईश्वर लहू गोलवाड असे सर्व पोलीस पथक त्या ठिकाणी आपल्या कर्तव्यावर हजर होते.
प्रदीर्घ अनुभव असलेले प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी आपल्या सर्व टीमला बोलवून योग्य त्या सूचना देऊन त्या सर्वांना आपापल्या पॉईंटवर जाण्याचे आदेश दिले तसे पाहता हे सर्वजण लवकरच परीक्षा केंद्रावर हजर झाले होते कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती व या ठिकाणी कसलाही गोंधळ होऊ नये परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी यांचे सर्वांचे नियोजन करण्यात आले होते केंद्रावर मेन गेट जवळ उमेदवारांची शारीरिक तपासणी करिता पोलीस परीक्षार्थींना रांगेत लावून एकेकाची तपासणी करीत होते.प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील हे सर्व ठिकाणी नजर ठेवून होते त्याच वेळेस पावणे आठच्या सुमारास कर्मचारी एचएचएमडी मशीनने उमेदवारांचे तपासणी करीत होते एक उमेदवार असा होता की त्याच्याजवळ काहीच नव्हते आणि तो परीक्षेला आलेला दिसत होता त्याच्यावर प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांची नजर गेली आणि त्यांनी त्याच्यावर नजर ठेवली तो जेव्हा तपासणीसाठी आला तेव्हा एचएचएमडी मशीनने आवाज दिल्यामुळे त्या उमेदवाराला पोलीस हवालदार ईश्वर गोलवाड यांनी त्याला विचारले की तुझ्या जवळ काही इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस आहे का? त्यावर तो गोंधळून गेला व उडवा उडवीची उत्तर देऊ लागला त्या ठिकाणी प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी त्याला बाजूला घेतले व त्याला विचारले की तू कुठून आला आहेस? आणि कशाकरता आला आहेस? त्यावर तो म्हणाला की साहेब मी बीड वरून आलो आहे आणि पोलीस शिपायाची लेखी परीक्षा द्यायची आहे त्यावर ते म्हणाले की तू बीड वरून आला आहेस आंघोळ वगैरे केली आहे का? आणि तुझी बॅग कुठे आहे? परंतु त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही शिवाय तो बोलत असताना त्याची नजर इकडे तिकडे नेत असल्याने त्याच्यावर या अनुभवी अधिकाऱ्याची दाट शंका बळवली त्याची पुन्हा तपासणी केली असता एचएचएमडी मशीन आवाज देऊ लागली आणि मग पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या डाव्या पायाला नी कॅप मध्ये एक सॅमसंग जे सेवन कंपनीचा काळ्या रंगाचा आणि त्यामध्ये जिओ कंपनीचे सिम व काळ्या रंगाचे ब्लूटूथ डिवाइस कनेक्टर व त्यामध्ये एअरटेल वोडाफोन आयडिया कंपनीचे सिम आढळून आले.पुन्हा त्याची तपासणी केली असता अंडरवेअरच्या खाली गुप्तांगाच्या जवळ एक डिवाइस कनेक्टर मिळून आल्याने पोलीस आश्चर्य चकित झाले.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विकास अंबरसिंग जौनवाल वय २४ असून तो शिक्षण घेत असल्याचे त्याने सांगितले तो बेंबळ्याची वाडी ,पोस्ट कचनेर तालुका जिल्हा औरंगाबाद येथून आल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी त्याच्याकडे परीक्षेसाठी असलेले प्रवेश पत्र मागितले असता त्यावर वेगळ्याच विद्यार्थ्याचे नाव त्यांना आढळून आले तसेच आधार कार्ड व पॅन कार्ड वर सुद्धा वेगळ्याच उमेदवाराचे नाव त्यांना दिसून आले हे करत असताना तो मात्र सतत त्याच्या डाव्या कानाला हात लावत होता त्यामुळे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना संशय आला की हा त्याच्या डाव्या कानाला सतत का हात लावत आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या पथकाला त्याचा कान चेक करायला सांगितला असता त्याच्या कानामध्ये ०१ सेंटीमीटर कमी लांबीचे ब्लूटूथ डिवाइस कनेक्टर अर्थात इयर बर्ड आढळला.पोलिसांना उमेदवाराचा प्रवेश पत्र आधार कार्ड पॅन कार्ड वरील फोटो चेक केला असता तो देखील उमेदवाराशी मिळता जुळता नसल्याचे आढळून आले.सदर वेळी उमेदवाराचे प्रवेश पत्र बघितले असता त्यावर बालाजी बाबू कुसळकर असे नाव होते व तसेच आधार कार्ड व पॅन कार्ड वर देखील बालाजी बाबू कोळसकर या उमेदवाराचे नाव होते. उमेदवारा जवळील असलेल्या कागदपत्रावरील विसंगतीमुळे सदर विद्यार्थ्यांची सखोल चौकशी केली असता त्याला विचारण्यात आले की, विकास परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस आणण्यास सक्त मनाई असताना व तशा सूचना प्रवेश पत्रावर असताना सदर इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस परीक्षा केंद्र का आणले व प्रवेश पत्रावरील फोटो तसेच प्रवेश पत्र कोणाचे आहे? हे आम्हाला खरे खरे सांग यावर प्रवेश पत्रावरील उमेदवार हा त्याचा मित्र असून तो मूळ उमेदवार आहे व त्याने सदरचे डिवाइस व मोबाईल मला देऊन सदरची परीक्षा देण्यासाठी डमी उमेदवार बसण्यासाठी सांगून परीक्षेत आलेल्या प्रश्नसंचाचे फोटो काढून ते त्याचा मित्र मूळ उमेदवार बालाजी पुरस्कार यांचे मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे पाठवायचे सांगितले होते तसेच सदर प्रश्नसंच पाठवल्यानंतर त्याचे उत्तरे यातील प्रवेश पत्रावरील उमेदवार हा त्यांचे मोबाईल द्वारे कॉल करून मला सांगेल व सांगितलेली उत्तरेही परीक्षेत लिहिण्याचे सांगितले होते त्या बदल्यात दहा हजार रुपये देऊन परीक्षा झाल्यानंतर परत दहा हजार रुपये असे वीस हजार रुपये देण्याचे ठरवले होते असे सांगितल्यानंतर तात्काळ याबाबतची सर्व माहिती ठाणे नियंत्रण कक्ष येथे कळविण्यात आली व झालेल्या सदर प्रकाराबाबत संशयित डमी उमेदवार विकास अंबरसिंग जौनवाल व त्याचा मित्र नामे संशयित बालाजी बाबू कोळसकर यांचे विरुद्ध तक्रार देण्यासाठी त्याला राबोडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी संशयित उमेदवारास विचारले की बायोमेट्रिक असतांना तू आत कसा जाणार होतास? त्यावेळेस तो म्हणाला की साहेब जो खरा उमेदवार आहे तो बायोमेट्रिक करून आत जाणार होता. त्यानंतर कोणतेही कारण देऊन तो बाहेर आल्यावर मी त्याच्या जागेवर जाऊन बसणार होतो. हे ऐकून ते सुद्धा आश्चर्यचकित झाले एवढा बंदोबस्त असून सुद्धा उमेदवार अशा चुकीच्या पद्धती का अवलंबत असतात असा प्रश्न त्यांना पडला.अशा चुकीच्या पद्धतीमुळे ते स्वतःचही व समोरच्या व्यक्तीचही आयुष्य पणा लावत असतात त्यासाठी चुकीचा मार्ग योग्य मार्गाने जाणेच हे युवक युवतींच्या भल्याचे आहेराबोडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी १) विकास अंबरसिंग जौनवाल , २) बालाजी बाबू कुळसकर यांना पोलीस भरती परीक्षेचे नियम व अटी माहिती असतांना देखील त्यांनी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या वेळी त्यांचा स्वतःचा फायदा व्हावा यासाठी आपापसात संगणमत करून बालाजी बाबू कुळसकर याने त्याचे स्वतःचे प्रवेश पत्र ,तसेच आधार कार्ड ,पॅन कार्ड हे डमी उमेदवार विकास अंबरसिंग जौनवाल यास देऊन त्याच्याकडे मोबाईल ,इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कनेक्टर, ब्लूटूथ देऊन उमेदवार अदलाबदली करून तोतयागिरी करून शासनाची फसवणूक करीत असताना मिळून आला त्या कारणाने त्याच्याविरुद्ध सरकार पक्षातर्फे भारतीय दंड विधान कलम 419 , 34 सह , महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मलप्रॅक्टिसेस अॅक्ट यूनिवर्सिटी ,बोर्ड अँड दर स्पेसिफाइड एक्झामिनेशन 1982 चे कलम ०७ प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोलीस हवालदार ईश्वर लहू गोलवाड यांनी दिली.
सदर पोलीस भरती मध्ये आलेल्या तोतया उमेदवारास प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्यास रंगीहात पकडल्याने या विभागाचे डीसीपी गणेश गावडे यांनी या सर्वांचे कौतुक केले.
सदर गुन्ह्याप्रकरणी पोलीस आयुक्त जय जीत सिंग ,डीसीपी गणेश गावडे ,एसीपी उत्तम कोळेकर यांच्या मार्गदार्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक विलास तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सुधाकर खाडे (क्राईम ब्रँच उल्हासनगर), तसेच मेन गेट जवळ व इतर अंमलदार माया मोरे (कासारवडवली पोलीस स्टेशन ठाणे ), पोलीस हवालदार सरनाईक (रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली ),महिला पोलीस शिपाई वनिता पाटील,पोलीस शिपाई सुनील केंगले (सेंट्रल पोलीस स्टेशन उल्हासनगर), पोलीस शिपाई रवी पावडे (कळवा पोलीस स्टेशन ठाणे ), ,पोलीस शिपाई आदिनाथ इंगोले(मुख्यालय ), महिला पोलीस शिपाई एस एन गावित ,पोलीस शिपाई आर एस डावेकर, ( ठाणे नगर पोलीस स्टेशन ठाणे ),महिला पोलीस अमलदार अर्चना शेळके आणि पोलिस हवालदार ईश्वर लहू गोलवाड (नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे ), विनायक पाटील (राबोडी पोलीस स्टेशन ठाणे ) यांनी परिश्रम घेतले .पुढील तपास राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.