CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार,

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

रिपोर्ट : सीमा वखरे

मुंबई :- "गुड टच, बॅड टच" च्या हा विषय शिकवल्यावर तिला समजले की तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार होत आहे . लैंगिक अत्याचार संधर्भात वर्सोवा पोलीसांनी आरोपी तरुणास अटक केली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम मधील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हा एकामेकांनाओळखत होते. आरोपीचे पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे जाणे सुद्धा सुरू होते. त्यातूनच आरोपीने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून अनेकदा त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला . त्या दरम्यान मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथे "गुड टच, बॅड टच" या विषयी सामाजिक संस्थेने जनजागृती केली असताना आपल्या सोबत चुकीचे घडल्याचे अल्पवयीन मुलीने आपल्या शिक्षिकेला सांगितले. यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्षिकेने या संबंधित माहिती मुलीच्या पालकांना दिल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर वर्सोवा पोलीसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलीसांनी आरोपी गोकुळ सिंह ,वय २१ या तरुणाला सात बंगाला येथून अटक केली. यानंतर पोलीसांनी आरोपीला अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी गोकुळ सिंह याला पोलीस कोठडी सुनावली. वर्सोवा पोलीस पुढील तपास करत आहे .

"गुड टच, बॅड टच" हा विषयी त्या अल्पवयीन मुलीला समजल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार होत आहे असे तिला कळले या विषयी अनेक महिला सामाजिक संस्थांनी जनजागृती महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये केली पाहिजे कारण त्यातूनच सर्व अल्पवयीन विद्यार्थ्यांना "गुड टच, बॅड टच" हा विषय समजेल.