CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : येथील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर मठ स्वामी भक्त कै अण्णा लिमये यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आला.पूर्वी डोंबिवली पूर्वे कडील श्री आफळे बुवा राम मंदिर येथे उत्सव होत होता.आता हा नांदिवली मठात संपन्न होतो.सकाळी कै.आण्णा साहेब लिमये यांच्या घरी असलेल्या स्वामी घ्या पादूका रथातून मिरवणूक काढण्यात येत तीचे मठात आगमन झाल्यानंतर अभिषेक, स्वामी समर्थ पोथिचे सामुदायिक प्रारायण व जप केला जातो, नंतर भजन व किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात,या जयंतीच्या निमित्ताने हाजारो स्वामी भक्त दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घेतात.
स्वामी समर्थ जयंती चा उत्सव आठवली येथील स्वामी भक्त आगलावे मठ, लोणावळा येथील स्वामी भक्त करंदीकर मठ, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण,ठाणे, मुंबई मधील गिरगाव कांदे वाडी,दादर आदि ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
मात्र सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील स्वामी समर्थ जयंतीचा मुख्य उत्सव श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी ला संपन्न होतो,सदर उत्सव अक्कलकोट येथे तीन दिवस साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे डोंबिवली जवळील दिवा येथे ही स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी साजरी केली जाते.