CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
बापू वैद्य: डोंबिवली
शोभायात्रा तथा गुढीपाडवा या निमित्ताने स्वागतासाठी सज्ज झालेल्या नगरीत राजकीय नेत्यांच्या त्यांच्या छबी सहित उभारलेल्या कमानी व मोठं मोठे फलक बाजी त्यामुळे नक्की उत्सव गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताचा की राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीचा आहे असा संभ्रम निर्माण झाला .
डोंबिवली सांस्कृतिक नगरी कशी लोप पावली!
महापालिका स्थापन होण्यापूर्वी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी नगर परिषद होती.व आता महापालिकेचा कारभार सुरू झाला.जनसंघातील निष्ठावंत मागे पडत गेली.पैसे द्या व कामे करून घ्या हे महापालिका युग अस्तित्वात येऊ लागले.त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रातील शहरे ,ग्रामीण भाग उतरंडीला येत चालला आहे.येन केन प्रकारे या शहरांना ओरबडले जाऊ लागले.नगर परिषद असतांनाच बेकायदा बांधकामे होत होती,पण आता महापालिकेचा कारभार सुरू झाल्यावर बेकायदा बांधकामाचा भस्मासूर वाढत चालला आहे, बेकायदा बांधकामे कशी होत गेली यांची चौकशी आयोग नेमले गेले पण तेही लाल फितीत अडकलेत.कारण बेकायदा बांधकामे ही सर्व राजकीय पक्षांनी केलेली आढळतात मग चौकशी आयोगाच्या अहवाल कसा पुढे येईल?
डोंबिवली राजकीय वर्चस्वाची लढाई!
गेल्या काही वर्षांपासून डोंबिवलीवर वर्चस्व भाजपच्या नेत्यांचे सूरू आहे.ना. रविंद्र चव्हाण,भाजप आणि संघ यांच्या पाठिंब्यामुळे आतापर्यंत शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे.मागील काही वर्षांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.डोबिंवली परिसरात कोणताही कार्यक्रम असो तो विकास कामांचे, भूमिपूजन,लोकापर्ण असो फलक व कमानी फलकारूपी संघर्ष जाणवतो.
शहरा भवितव्य काय?
डोंबिवली शहरावर पहिल्यापासून पूर्वी जनसंघ आणि आताचा भाजप चे वर्चस्व असल्यामुळे ते ठरवतील तोच उमेदवार निवडून येत आहे. जगन्नाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील व आता रविंद्र चव्हाण हे शहराचे नेतृत्व करत आहेत,शहरात पांढरपेशा मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर असले तरी वरील नेत्यांनी वर्चस्व निर्माण केले आहे.
पूर्वी चे डोंबिवली तिचा थोडासा इतिहास!
उल्हास नदी काठावरील शेती-खाजण जमिनी व मासे मारी चे उद्योग असलेल्या लाखांचे गाव म्हणजे पूर्वीची डोंबोली काही काळानंतर शब्दाचा विस्तार होऊन डोंबिवली हे नाव प्रचलित झाले.या शहराला शंभर वर्षांपेक्षा जास्त इतिहास या शहराला आहे.या शहरावर आगरी समाजाचा पगडा होता व आजही पाहायला मिळतो.बहुतांशी नागरिकांना मुंबईजवळचे परवडणा-या घराचे ठिकाण म्हणून डोंबिवली ला पसंती मिळत आली.क