CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (बापू वैद्य) : गेले काही दिवसांपासून डोंबिवली कल्याण परिसरातील हावेचे प्रदुषण वाढत आहे असा अहवाल आला आहे,या साठी या परिसरातील कारखानदार यांना जबाबदार धरले जाते,मात्र मुळ कारण अजुन ही दुर्लक्षित.मुबंईत कारखाने नाहीत पण तरीही तिथली हवा प्रदूषित आहे.यांचाहि अभ्यास करणं गरजेचं आहे अशी अपेक्षा कल्याण अंबरनाथ मॅन्यूफेक्चर असोसिएशनचे (कामा संघटना)अध्यक्ष देवेन सोनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की,या परिसरातील मोठ्या रहिवासी वसाहतीसाठी केलेली वृक्ष तोड कुठलाही ताळमेळ न ठेवता वाढत चालले रहिवासी वसाहितीचे बांधकाम व ते करताना होणारी धुळीचे प्रचड प्रदूषण, जागोजागी चालले रस्त्यांची खोदाई व बांधकाम आणी त्यातून धुलिकण,कच-याची आ वासून उभी असलेली समस्या आणि त्यावरील तोडगा म्हणून कचरा जाळण्याचे प्रकार,वाहनांचे अनियंत्रित परवाने आणि त्यामुळे वाढलेली वाहने, वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे प्रदुषण ही प्रमुख कारणे आहेत.महापालिका, एम आयडीसी आणि अन्य संबंधित यंत्रणा नी लक्ष देऊन हवेचा स्तर टिकवायला हवा अशी मागणी सोनी यांनी केली आहे.हवेचे प्रदुषण अनियंत्रित असल्याने यात एकूण प्रदुषणाचा सगळ्यात मोठा वाटा आहे.
या साठी सगळ्या यंत्रणांनी समन्वयाने एकत्रितपणे येऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात यावी या साठी कामा संघटना चे सहकार्य करेल अशी सोनी यांनी सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे.