CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

उल्हासनगरमधील वाहतुकीत शुक्रवारी बदल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे : उल्हासनगर शहर तसेच उल्हासनगर व विठ्ठलवाडी वाहतूक उप विभाग अंतर्गत उद्या, दि. १० मार्च २०२३ रोजी शिवजयंती निमित्त मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे यांनी कळविली आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे -

प्रवेश बंद - १) बिर्ला गेट - भारत चौक - शिरु चौक - नेहरु चौक- लिंक रोड - न्यू ईरा चौक - शिवाजी चौक - पवई चौक - हिरा घाट - शास्त्री चौक या मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना शिवजयंती मिरवणुक शिवाजी चौकात जाईपर्यत दि. १० मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० ते रात्रौ २३.०० वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - अ) बिर्ला गेट :- बिर्ला गेट मार्गे उल्हासनगर नं. १ व इतर ठिकाणी जाणारी वाहतूक शहाड जकात नाका - महात्मा फुले मार्केट - २४ स्कुल मार्गे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग - ब) भारत चौक :- भारत चौक मार्गे - गोल मैदान - नेहरू चौक कडे जाणारी वाहतूक मच्छी मार्केट मार्गे तसेच बाबा बेफिक्री चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग - क) नेहरु चौक :- नेहरु चौक मार्गे शिरु चौक तसेच खेमाणी कडे जाणारी वाहतूक मच्छि मार्केट व भारत चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग - ड) शिवाजी चौक :- अंबरनाथ शहर कडून कल्याण कडे जाणारी वाहतुक फॉलवर लाईन येथून जवाहर हॉटेल - नेहरू चौक - गोल मैदान - मधुबन चौक - गुरुद्वारा चौक - शांतीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग - इ) कल्याण अंबरनाथ रोडने अंबरनाथ दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहने होंडा शोरूम येथून डावे वळण घेवून डॉल्फीन क्लब - गुरुद्वारा चौक - मधुबन चौक - नेहरु चौक - जवाहर हॉटेल - फॉलवर लाईन मार्गे इच्छित स्थळी जातील.

ही वाहतुक नियंत्रण अधिसुचना दि. १० मार्च २०२३ रोजी सायंकाळी १८.०० ते २२.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. ही अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहीका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त, मुख्यालय २ अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे यांनी कळविले आहे.