CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

स्वप्नपूर्ती महिला मंडळ व गृह उद्योगाची गगन भरारी - महिलांनी स्वतंत्र उद्योग उभारावे - सौ. सीमाताई वखरे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : दिवा या ठिकाणी स्वप्नपूर्ती महिला मंडळ व गृह उद्योग गेल्या सहा वर्षापासून कार्यरत असून संस्थेच्या संस्थापिका सौ. सोनाली गिरीश पाटील यांनी या ठिकाणी महिलांचे संघटन उभे करून त्यांचे विविध बचत गट निर्माण केले असून त्या सतत महिलांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी त्या कार्यरत आहेत.जास्तीत जास्त महिलांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सौ. सोनाली पाटील ह्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत.

दिनांक ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी स्वप्नपूर्ती महिला मंडळाच्या वतीने त्यांनी महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन व सार्वत्रिक हळदीकुंकू तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन ओंकार नगर मैत्री पार्क रहिवासी संघ दिवा (पूर्व ) ,ग्लोबल स्कुल जवळ ,दिवा येथे करण्यात आले होते.यावेळी हा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला गेला. महिलांना त्यांच्या उद्योग व्यवसाय प्रगतीसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा , श्री स्वामी सखा (मासिकाच्या) मुख्य संपादिका तसेच महिला आश्रय महिला संस्थेच्या संस्थापिका सौ.सिमाताई वखरे यांना प्रमुख अतिथी म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमाची माहिती सौ.सिमाताई वखरे यांनी दिली . लवकरच स्वप्नपूर्ती महिला मंडळाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सौ. सोनाली गिरीश पाटील यांच्या वतीने सौ.सिमाताई यांनी महिलांना संबोधित करतांना सांगितले . १८ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण व उद्योग व्यवसायासाठी आर्थिक भांडवल उपलब्ध करून देण्याचे (प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना) प्रमुख मार्गदर्शक सौ. सीमा ताई वखरे यांनी या प्रसंगी ठोस आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला सौ. शुभा यशवंत पाटील. (वरिष्ठ सल्लागार स्वप्नपूर्ती महिला मंडळ), सौ. रसिका पाटील, मेघा पाटील, लता पाटील, रेश्मा पाटील, सुवर्णा कांबळे, (सामाजिक कार्यकर्त्या) रुपाली नाईक, मनीषा पांचाळ, सुमिता आंबोकर, ललिता सपकाळ, करुणा बांगर, शुभांगी खरात, श्रध्दा शिंदे, संगीता भालेराव, सोनाली झोडगे (क्राईम बॉर्डर च्या पत्रकार) तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वप्नपूर्ती महिला मंडळाची स्थापना, उदिष्टे, आता पर्यंतच्या कामांचा आढावा, आणि पुढील कामांची रूपरेषा प्रास्ताविकाच्या माध्यमातून सौ. करुणा सचिन गगे .(मुख्य कार्यकारी अधिकारी ,स्वप्नपूर्ती बचत गट) यांनी सादर केले. या समारंभास संवेदना एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी श्री. महेंद्र दळवी सरांचे विशेष योगदान तसेच मैत्री पार्क रहिवासी संघ दिवा यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक अमर राऊत आणि विवेक पोरजी यांनी केले.