CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

एडिशनल एस.पी.श्री.डी.डी.गवारे साहेब यांच्या हस्ते वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे पुरस्कार प्रदान व शैक्षणिक साहित्य वाटपासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

एडिशनल एस. पी. श्री.डी.डी.गवारे साहेब यांच्या हस्ते वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटपासह विविध कार्यक्रम दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे.

डोंबिवली : गेल्या ३२ वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहून क्राईम बॉर्डर च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित असलेले राजेंद्र वखरे एडिशनल एस. पी. श्री.डी.डी.गवारे (से..नि.) साहेब यांच्या प्रेरणेने दि.१४ जून २०१३ रोजी स्थापन झालेल्या क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (NGO) च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत आहेत.शहापूर तालुक्यातील पाषाणे या ग्रामीण भागात हा. भ .प. डॉ. कैलास निचिते (महाराज) यांनी वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ अंतर्गत सुरू केलेल्या निवासी विद्यापीठात एकल पालकत्व ,निराधार ,अनाथ मुलांसाठी आश्रम सुरू केला असून यामध्ये मुलांना तबला ,पेटी, मृदंग ,प्रवचन ,कीर्तन , बुद्धिबळ यासह विविध अभ्यासक्रम सुरू केला असून त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था केली आहे.

या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे राजेंद्र वखरे यांनी व आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. सीमा वखरे यांनी शैक्षणिक साहित्य भेट देऊन मुलींना सॅनिटरी पॅड व साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारीं १.३० वाजता आयोजित केला असून आश्रमाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून या ठिकाणी एडिशनल एस. पी. श्री.डी.डी.गवारे साहेब यांच्या हस्ते क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या संकेत स्थळाचे अनावरण व क्राईम बॉर्डर विशेषांक २०२२ व श्री स्वामी सकाळ विशेषांक २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून त्याचबरोबर ह. भ . प . श्री . डॉ. कैलास निचिते महाराज यांना ज्ञानपीठ पुरस्कार २०२३ मे सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच डोंबिवली येथील उद्योजक श्री . रमेश काठे यांना आध्यात्मिक सेवा पुरस्कार २०२३;तर प्राथमिक शिक्षक अब्दुल आदम शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ तसेच प्राध्यापिका सौ. करुणाताई गगे यांना प्रबोधन सेवा पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात येणार आहे .

सदर कार्यक्रम हा दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी पाषाणे तालुका शहापूर या ठिकाणी संपन्न होत आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.डी.डी.गवारे साहेब ॲडिशनल एस . पी. अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य ( से.नि.), अतिथी व. पो. निरी. संजय साबळे पडघा पोलीस स्टेशन ,आर्थिक गुन्हे शाखा मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक जयेंद्र भोयर, क्राईम बॉर्डर चे पुणे निवासी संपादक नितीन सैद त्यांच्यासह सौ.माधुरी जयेंद्र भोयर ,क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष तथा शांतिनिकेतन मास मीडिया जर्नलिझम सेंटर चे डायरेक्टर राजेंद्र वखरे सर ,श्री स्वामी सखा मासिकाच्या संपादिका व आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.सिमाताई वखरे ,क्राईम बॉर्डर चे राज्य पदाधिकारी तथा उद्योजक श्री . रमेश काठे साहेब, सौ.भारती रमेश काठे , क्राईम बॉर्डर च्या पुणे जिल्हा प्रतिनिधी श्रावणी उर्फ चित्रा कामत ,क्राईम बॉर्डर चे छायाचित्रकार श्री. भरत सावंत , श्री स्वामी सखा मासिकाच्या प्रतिनिधी सौ.रजनी सावंत,क्राईम बॉर्डर चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी संतोष कोलंबकर,क्राईम बॉर्डर च्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी सोनाली झोडगे,रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरिया डोंबिवली चे अध्यक्ष दिनेश खरोटे साहेब, क्राईम बॉर्डर चे नाशिक शहर प्रतिनिधी किशोर कुमावत , एन ए.कदम (व्यवस्थापन समिती), प्रा.सौ.करुणाताई गगे छायाचित्रकार रमेश गवाणकर ,गावकरी , महिला ,पालक वर्ग उपस्थित राहणार आहेत.