CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत पोखरण येथील वसतीगृहात मुलींसाठी प्रवेश उपलब्ध

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत पोखरण, रोड न. २, उर्वी पार्क ठाणे (प.) येथे वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थिनींनी अर्ज करावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्यांनी केले आहे.

या वसतिगृहाची क्षमता ३४ विद्यार्थिनींची असून या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी कमीतकमी १० पास व त्यानंतर प्रवेश घेतलेल्या व्यवसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य इ. ग्राह्य धरण्यात येतील. या वसतिगृहामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत विद्यार्थींनीना अत्यल्प दरात राहण्याची सोय शासनातर्फे करण्यात आली असून खानावळीचा खर्च हा स्वतः करावयाचा आहे. या योजनेंतर्गत मुलींना शासनातर्फे निर्वाह भत्ता दिला जाणार असून तो उत्पन्न मर्यादेवर अवलंबून आहे. विद्यार्थिंनीनी हा भत्ता वसतिगृह चालविण्यासाठी दिलेल्या संस्थेस देणे आवश्यक आहे. वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेला अर्जाचा नमुना पोखरण, रोड न. २, उवीं पार्क ठाणे (प) येथे उपलब्ध आहे. विद्यार्थीनीनी हा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जमा करावा.

वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीनी व पालकांचे एकून उत्पन्न ८.०० लाखाच्या मर्यादेपर्यंत असावे. या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक व दिव्यांग विद्यार्थीनींना आरक्षण उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी श्री. गजानन सोनावणे (मोबाईल नं.- ०९८१९०५६१२२) यांच्याशी संपर्क करावा, असे ठाणे शासकीय तंत्रनिकेतनचे अधिवाख्याता (स्थापत्य) सु. अं. जानराव यांनी कळविले आहे.