CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : सांस्कृतिक नगरी डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.डोंबिवलीकर रहिवासी गजानन माने यांना मानाचा पद्मक्षी किताब जाहीर झाला.माने यांच्या ३५ वर्षे अखंडपणे कृष्ठरुग्णां सेवा करीत आहेत.त्याच्या या कार्याची दखल घेतली गेली. ज्येष्ठ दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर कृष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी पद्म पुरस्कार माळवणारे माने हे देशातील दुसरी व्यक्ती ठरली आहे.त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच केडीएमसी चे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांडगे यांनी माने यांची भेट घेऊन त्यांचा गौरव केला. माने यांनी १२वर्षे नौदलाच्या माध्यमातून देशसेवा केली.तेथून निवृत्त झाल्यावर यांनी ३५ वर्षे कुष्ठरूग्णाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतला.
१९६२ साली भारत चीन युद्धाने भारवलेल्या माने यांनी घरी न सांगता १९६५ मध्ये सैनिक म्हणून नौदलात भरती होण्याचा निर्णय घेतला.नौदलातील १९६५ते१९७६ या कालावधीत १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील सहभाग बद्दल माने यांना संग्राम मेडल मिळालं आहे.