CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
रिपोर्ट : सौ.सिमा वखरे
डोंबिवली : रिक्षा चालक-मालक युनियन डोंबिवली तर्फे वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत तोंडवळकर विद्यावर्धिनी तर्फे विद्यार्थ्यांची रॅली त्याचप्रमाणे मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर प्रसंगी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री .रमेश कल्लुलकर त्यांचे सहकारी श्री. देवणे , श्री.अमोल पवार प्रमुख पाहुणे म्हणून तसेच लोकसत्ताचे प्रतिनिधी श्री. भगवान मंडलिक तोंडवळकर विद्यावर्धिनी चे प्राचार्य सौ. संगीता आचरेकर संस्थापक अध्यक्ष श्री . नितीन तोंडवलकर रिक्षा युनियनचे कार्याध्यक्ष श्री. अंकुश म्हात्रे उपाध्यक्ष श्री. शेखर जोशी व त्यांचे इतर सहकारी श्री.संतोष पाटील, वैभव म्हात्रे ,अजिंक्य म्हात्रे ,रोहित म्हात्रे ,निळकंठ पटवर्धन, ईश्वर कनोजिया ,गजानन जोशी ,त्याचप्रमाणे पूजा ड्राइविंग स्कूलचे संचालक श्री. विजय कारंडे युनियनचे जेष्ठ सहकारी श्री . प्रकाश राऊळ व तोंडवळकर विद्यावर्धिनीचे विद्यार्थी तसेच इतर शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते सदर रॅली तोंडवळकर विद्या वर्धिनी ते कोहिनूर मंगल कार्यालय महात्मा गांधी रोड डोंबिवली पश्चिम स्टेशन समोर पर्यंत काढण्यात आली त्याला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.