CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पहिली न्यायाधीश (जज) भिवंडी तालुक्यातील खंबाळा गावातील लेक कु.रुणाली दयानंद पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व न्याय दंडाधिकारी ( प्रथम वर्ग ) मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात ८ वा क्रमांक फटकावून दिवाणी न्यायाधीश (जज) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल न्यु हिंदुस्थान कामगार सेना तर्फे त्यांची भेट घेवून अभिनंदन केले, व त्यांना पुढील वाचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी न्यु हिंदुस्थान कामगार सेना ठाणे जिल्हाप्रमुख दिलशाद शेख, न्यु हिंदुस्थान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सदस्य हर्षवर्धन साईवाला, न्यु हिंदुस्थान कामगार सेना ठाणे जिल्हा चिटणीस राहुल विष्णु चंदे, न्यु हिंदुस्थान कामगार सेना सरचिटणीस सुभाष पाटील, सदस्य शैलेंद्र घोटकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.