CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांच्या घरासाठी समिती गठीत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकारांसाठी अल्पदरात घरे मिळावी यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत डोंबिवली येथील टिळक नगर समाज मंदिर हॉलमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांना अल्प दरात शासनाची घरे मिळावी, त्याकरिता संपादक /पत्रकार कैलाश म्हापदी,बापू वैद्य
आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य आत्माराम नाटेकर यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीस वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी दत्ता घुले उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी बापू वैद्य होते. घरासाठीच्या शासकीय योजना, बॅंक कर्ज व्यवस्थापन, शासकीय पत्रकार कल्याण निधी, शासकीय आरोग्य योजना यांमध्ये पत्रकार कसे लाभार्थी होऊ शकतात ? येणा-या अडचणींना कसे सामोरे जावे यांचे मोलाचे मार्गदर्शन श्री .म्हापदी यांनी केले.तसेच पत्रकारांनी गट- तट विसरून घरांसाठी संघटीत व्हावे असे सांगितले. शासकीय योजनेतून घरे मिळावीत यासाठी पत्रकारांना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याची माहिती आत्माराम नाटेकर यांनी दिली.


बैठकीची प्रस्तावना नरेंद्र थोरावडे यांनी केली.आभार निलम चौधरी यांनी मानले.सारिका शिंदे, क्राईम बॉर्डर चे संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र वखरे, किशोर पगारे, तोषेश शुक्ला यांनी मते मांडली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचा आढावा बापू वैद्य यांनी यावेळी घेतला.

कल्याण डोंबिवली पत्रकार घरकुल समन्वय समितीतील पदाधिकारी अध्यक्ष - बापू वैद्य ,उपाध्यक्ष - कलिमभाई शेख,सचिव/खजिनदार - सारीका शिंदे ,सहसचिव - किशोर पगारे, सदस्य - निलम चौधरी ,नरेंद्र थोरावडे , तोषेश शुक्ल, कुणाल म्हात्रे, शरद शहाणे, संदीप सरवणकर