CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
सौ.सिमा वखरे
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांच्या माध्यमातून अबोली रिक्षा आणि मोटर ट्रेनिंग स्कूल याची वाहतूक नियमांची जनजागृती करणारी रॅली संपन्न
कल्याण : येथील Dy.RTO विनोद साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथील ARTO रमेश कलुरकर यांनी झेंडा दाखवून रॅलीचे उदघाटन केले.
या रॅलीमध्ये महिलांच्या अबोली रिक्षांनी सहभाग घेतला तसेच मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या चार चाकी वाहूनांनी वाहनांना वाहतूकीचे नियम पाळण्याचे संदेश देणारे फलक लावून सहभाग घेतला.रॅलला सकाळी ८.३० ला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथून सुरुवात करण्यात आली.बिर्ला कँलेज मार्गे ,प्रेम आटो, खडकपाडा कँरकल, दुर्गाडी किल्ला मार्गे, साईचौक वाणी स्कूल वरुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथे आली.रॅली मध्ये परीवहव कार्यालयातील सर्व अधिकार आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.तसेच सेफ्टी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष,विशाल शेटे यांनी वाहतूक नियमांच्या चित्र फलकाच्या माध्यमातून संदेश देऊन सहभाग नोंदविला.
