CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहे जानेवारी, 2023 साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर झाले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंबसाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रती व्यक्ती 3 किलो, गहू प्रती व्यक्ती 2 किलो असे आहेत. अंत्योदय अन्न योजना – तांदूळ मोफत दराने प्रती शिधापत्रिका 20 किलो, गहू मोफत दराने प्रती शिधापत्रिका 15 किलो असे आहेत.
बिगर गॅसधारक शिधापत्रिका धारकांना केरोसीनचे दर ठाणे (36/फ) रु. 71.70/-, ठाणे (41/फ) रु.71.70/-, मुंब्रा (48/फ ) रु. 71.70/-, वाशी (41/फ) रु. 71.70/-, भाईंदर (41/फ ) रु. 71.70/-, कल्याण (38/फ) रु.71.89/-, डोंबिवली(मुख्य) (39/फ ) रु. 71.89/-, डोंबिवली (उप) (39/फ) –71.89, उल्हासनगर (मुख्य) (40/फ ) रु. 71.97/-, उल्हासनगर (उप) (40/फ) 71.97), (अंबरनाथ) (46/फ) रु. 77.97/-, (बदलापूर) (46/फ) रु. 71.97/-, भिवंडी (37/फ) रु. 71.79/- प्रती लिटर या प्रमाणे असून 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर वाटप करण्यात येणार असल्याचे असे शिधावाटप उपनियंत्रकांनी कळविले आहे.