CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
रिपोर्ट : सौ.सिमा वखरे
डोंबिवली : रस्ता सुरक्षा अभियान २०२३ या अंतर्गत डोंबिवली शहर वाहतूक विभागाचे व. पो. निरी. उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सेफ्टी वेलफेअर असोसिएशन.तसेच ए.एस.जी.आय हाऊसपिटल ,आर.एस.पी शिक्षक अधिकारी यांच्या सहयोगाने वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संदेश देऊन जनजागृती रॅली काढण्यात आली. आज दि. ११/०१/२०२३ रोजी डोंबिवली मानपाडा रोड पांडुरंग शाळेपासून ते वाहतूक शाखा डोंबिवली पर्यंत रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये वाहतूक नियमाचे संदेश देऊन जनजागृती करण्यात आली.
या रॅलीत २५० शालेय विद्यार्थी आणि ५० ए.एस.जी.आय हाऊसपिटल चे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच मुख्य आकर्षण हे ओमकार ईंग्रजी हायस्कूल चा बँनड पथक या बँडचे प्रमुख शिक्षक केतन कापडणे यांनी उत्तम रीत्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देउन बँन पथक तयार करून घेतला . रॅली मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पोस्टर आणि घोषवाक्य देऊन जनजागृती केली रॅली मानपाडा रोड वरुन सुरुवात करून रॅलीची सांगता ही रामनगर वाहतूक शाखा डोंबिवली येथे करण्यात आली.या रॅली मध्ये नेरूलकर काँलेज,म. ठ. वि. काँलेज,प्रकाश विद्यालय, अचिव्हर्स काँलेज कल्याण,तसेच के.एन.पटेल काँलेज या सर्व काँलेज आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सेफ्टी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे यांनी रॅलीचे नियोजन पाहिले वाहतूक विभागाचे उप पोलीस निरीक्षक एन.के.चव्हाण आणि सर्व वाहतूक कर्मचारी आणि वार्डन यांनी योग्य नियोजन केले.