CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
रिपोर्ट सौ.सिमा वखरे
डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरिया ही संस्था नेहमीच नवनवीन शैक्षणिक व सामाजिक उपक्रम गेल्या ३३ वर्षांपासून अविरत राबवित आहे. २८ डिसेंबर रोजी या संस्थेतर्फे मुरबाड तालुक्यातील अभिनव विद्या मंदिर, कासगाव येथे टेलिस्कोप द्वारे आकाश दर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, तारका समूह, आकाशगंगा इ. अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे दाखविण्यात आले. तसेच नक्षत्रे, तारका समूह, ग्रह तार्यांच्या आकार व त्या मधील अंतर, होकायंत्राशिवाय दिशा दर्शन ई. माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण सारख्या संस्थेस भेट देणे शक्य होत नाही. या कारणाने ते विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित राहू नयेत म्हणून या शिबिराचे आयोजन केल्याचे क्लब चे प्रकल्प प्रमुख श्री.शरद गंभीरराव यांनी सांगितले. १६० मुलामुलींनी या रात्र शिबिरात उत्साहाने भाग घेतला.
तसेच जगभरातील ज्ञान व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून समजवणे सोपे व्हावे या हेतूने शाळेसाठी टेलिव्हिजन सेट देण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरिया चे अध्यक्ष दिनेश खरोटे, सचिव राजेश पटेल, खजिनदार पोपटलाल भंडारी, प्रकल्प प्रमुख शरद गंभीरराव , भावी अध्यक्ष महेंद्र भोईर, रोटरीयन प्रकाश शहा, रो प्रदीप रूंगठा, रो मंगेश जडे , रो दत्ता केणे, ई. मान्यवर उपस्थित होते.