CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
आनंद विश्व गुरुकुल मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न
ठाणे : दि .१८ नोव्हेंबर २०२२ रोजी आनंद विश्व गुरुकुल , ए. सी. सी. सिमेंट कॉलनी समोर ठाणे. (प) येथे प्रमुख पाहुणे प्रो. बायोटिक्स लॅब्रॉटरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.श्री. जयेश अहिरे सर, न्युज १८ लोकमत चे पत्रकार श्री. मिलिंद भागवत सर ,संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास ठुसे सर, सचिव, श्री. डॉ. प्रदीप ढवळ सर, संस्थेच्या विश्वस्त व जेष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ . हर्षला लिखिते मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. सीमा हर्डीकर मॅडम, कौशल्य विकास विभागाच्या समन्वयक सौ. मयुरा गुप्ते मॅडम, मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन महोत्सवाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर मॅडम व समन्वयक स्वराली माने मॅडम यांनी केले.
या प्रसंगी शाळेतील पूर्वप्राथमिक व प्राथमिकच्या मुला - मुलींनी वेगवेगळे प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून पाण्याचे स्रोत, पाळीव प्राण्यांची घरे, धरण, बाष्पीभवन, चंद्र ग्रहण, पृथ्वीवरील वातावरण असे कलात्मक व मनोरंजनात्मक वेगवेगळॆ प्रयोग या विज्ञान प्रदर्शनात दाखवून, प्रात्यक्षिक करून त्या प्रयोगा बद्दल माहिती करून दिली. या विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सहभाग मोठा होता, तसेच विविध तक्त्यांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ व त्यांची माहिती दाखवली गेली. प्रमुख पाहुण्यांनी, संस्थ्येच्या पदाधिकाऱ्यांनी व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या सर्व विज्ञान प्रदर्शन महोत्सवासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खुप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत असणाऱ्या कला सादर केल्या.