CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Sanjay Karle : पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्ले याची निर्घृण हत्या,ऑडी कारमध्ये आढळला मृतदेह

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

मुंबई गोवा महामार्गावर एका फार्म हाऊसच्या बाहेर आलिशान ऑडी कारमध्ये संजय कार्लेचा मृतदेह आढळून आला आहे . संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. सोन्याची बनावट नाणी विकून तो अनेकांची फसवणूक करायचा. त्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलीसांच्या अटकेत ही होता,गेल्या सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता.

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर काल संध्याकाळी ऑडी कारमध्ये पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्ले या व्यापाऱ्याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. संजय कार्ले असं खून झालेल्या व्यापाऱ्याचं नाव असून ते तळेगांवचे रहिवासी आहेत. ऑडी ही कार गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावर उभी होती. संजय कार्ले याची दोन ते तीन दिवसांपूर्वीच हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.

प्राप्त सूत्र नुसार मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक ऑडी कार उभी होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी काल संध्याकाळी एका व्यक्तीनं कारच्या आतमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्याला कारमध्ये संजय कार्ले याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसला . त्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती तात्काळ पनवेल पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीसांनी कार्ले याचा मृतदेह कारमधून बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे.कारमध्ये संजय कार्लेचा मृतदेह २४ तासांपेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्यानं तो कुजला आहे. याशिवाय त्याच्या छातीवर धारदार शस्त्रानं वार करून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या , त्याचा तपास सुरू असून शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून सत्य माहिती समोर येईल. पुढील तपास पनवेल पोतीस करीत आहे.

कोण आहे संजय कार्ले? संजय कार्लेचा तळेगांवात पाण्याच्या टॅंकरचा व्यवसाय आहे .त्याच्यावर तळेगांव पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती परंतु तो परोलवर सुटला होता. याशिवाय सोन्याची बिस्कीटांच्या विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.