CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बनावट कागदपत्रे सादर करून व्यापाऱ्यानं बुडवला चक्क ११० कोटींचा जीएसटी; एकाला अटक

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

कोकण विभागीय निवासी संपादक : डॉ. गजानन आंबेकर

पुणे : पुण्यातील एका व्यापाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या साह्याने जीएसटी विभागाची फसवणूक करत तब्बल ११० कोटींचा शासनाचा कर बुडवला आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात तपास मोहिम सुरू केली असून यात हा प्रकार उघडकीस आला.

रामनारायण वरूमल अग्रवाल असे कर बुडवणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अग्रवाल याने ६३० कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांद्वारे ११० कोटी रुपयाचे बनावट कर क्रेडिट वापरले आणि ते पास केले आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने केलेल्या तपासणीत रामनारायण बरुमल अग्रवाल (वय ६२) यांनी २६ बोगस कंपन्या तयार करत करत कर बुडवल्याचे पुढे आले आहे. या कंपन्यांनी ५६. ३४ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे आणि ५४. ६४ कोटी रुपयांचे बनावट कर क्रेडिट वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पास केल्याचे आढळून आले. याप्रकरणी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.