CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

तरुणीवर बलात्कार करून ३२ वर्षीय नराधम फरार, बसमधील ओळख पडली महागात !

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:14 AM

तरुणीवर बलात्कार करून ३२ वर्षीय नराधम फरार, बसमधील ओळख पडली महागात !

ठाणे : ३२ वर्षीय नराधमाशी ३४ वर्षीय तरुणीला बसमध्ये झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन नराधमानं पीडितेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेवर अत्याचार केला. शिवाय पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाच्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात अत्याचारसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गणेश गोपी उर्फ पिंटया (32) असं गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचं नाव असून तो फरार झाला आहे.

बसमधून प्रवास करताना झाली ओळख : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश उर्फ पिंट्या हा भिवंडी शहरातील कोंबडपाडा येथील एका सोसायटीत राहत असून तो खासगी कंपनीत काम करतो. तर पीडित महिलाही त्याच परिसरात राहत असूनही तीही माणकोली भागात एका कंपनीत काम करत आहे. आरोपी महेश आणि पीडिता बसनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मानकोली असा प्रवास करत असतानाच त्यांच्यात ओळख झाली. त्यानंतर याच ओळखीतून पीडितेनं आरोपीला तिचे खासगी फोटो पाठवले. हेच खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी महेशनं पीडितेला ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत वज्रेश्वरी आणि गणेशपुरी येथील लॉजमध्ये नेवून पीडितेवर जबरीनं अत्याचार केला आहे.


शारीरिक संबधास नकार दिल्यानं मारहाण करून फोटो व्हायरल करण्याची धमकी : दरम्यान पीडितेनं शारीरिक संबधास नकार दिल्यावर वेळोवेळी पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. पीडितेचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीनं वारंवार अत्याचार केला आहे. त्यामुळे पीडितेनं सततचा होणारा त्रास असहय्य झाल्यानं अखेर 23 सप्टेंबर रोजी निजामपूरा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराचं कथन केलं. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून महेशच्या विरोधात भान्यासं कलम 64(1), 64(2) (ड), 115(2), 352,351 (2) प्रमाणं गुन्हा दाखल केला असून पोलिसांची कुणकुण लागताच महेश फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती या घटनेचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक फडतरे यांनी दिली आहे. sabhar etvbhart