CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे, :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी कळविली आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी सन 2023 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. याचे संभाव्य वेळापत्रक आयोगाने त्यांच्या www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-2023, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा -2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा -2023, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2023, राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक नियंत्रक वैधमापन शस्त्र मुख्य परीक्षा-2023, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023 व महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षांचे आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे.