CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नेटवर्क नाही, आवाज येत नाही ,फोन करतो साहेब

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : क्राईम बॉर्डर व श्री स्वामी सखा दीपावली विशेषांक २०२२ साठी ज्यांनी ज्यांनी अथक परिश्रम घेतले. शुभेच्छा जाहिराती देऊन सहभाग घेतला. साहित्य ,कथा, कविता पाठवल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

काहींनी फक्त आश्वासने दिली फोन करतो, सांगतो ,नेटवर्क नाही, आवाज येत नाही ,मी कामात आहे, दवाखान्यात आहे, प्रवासात आहे, दीपावली विशेषांक २०२२ ची कल्पनाच नाही. (तर काहींनी फोनच घेतले नाही) असे विविध कारण सांगून दीपावली विशेषांका साठी काहीही योगदान दिले नाही, कोणत्याही प्रकारचा सहभाग नोंदविला नाही.परंतु क्राईम बॉर्डर ओळखपत्राची मुदत संपण्याच्या वेळेस अनेक वेळा फोन करणारे शहर प्रतिनिधी ,तालुका प्रतिनिधी,जिल्हा प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून आय कार्ड मागणारे,पण एकही बातमी न पाठवणारे,काहीही अडचण उद्भवल्यास हक्काने फोन करणारे,परंतु स्वतःहून शुभेच्छा जाहिरातीसाठी फोन न करणारे,पण सर आपली बातमी प्रकाशित झाली पाहिजे असे सांगणारे,परंतु सामाजिक उपक्रमामध्ये प्रतिसाद न देणारे आमच्या फक्त सोबत असलेले अनेक सहकारी अशांचे विशेष खूप खूप मनःपूर्वक त्रिवार आभार. कारण त्यांच्यामुळेच उमेद जास्त वाढते.व क्राईम बॉर्डर परिवार जोमाने कामाला लागतो.

टीप : कधीही प्रसिद्धीची हाव नसणारे , क्राईम बॉर्डरला व एनजीओ ला काय हवं आहे. याची जाणीव असणारे स्वतःहून आम्ही कशी आणि काय मदत करावी असे विचारणारे,पुढचा सामाजिक प्रोग्राम कुठे असे विचारणारे ,सदैव मी दिलेल्या आवाजाला प्रतिसाद देणारे माझे हाताच्या बोटावर मोजणारे खरोखर हितचिंतक असणाऱ्यांचा मी कायम ऋणी आहे. कारण त्यांच्याच मुळे क्राईम बॉर्डरची व एनजीओ ची वाटचाल सुरू आहे.

पुन्हा एकदा ज्ञात ,अज्ञात ,हितचिंतकांचे शतशः आभार.

क्राईम बॉर्डर टीमच्या वतीने - राजेंद्र वखरे