CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
कोकण निवासी संपादक डॉ.गजानन आंबेकर
Ratnagiri रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथे एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाभोळकर क्रिकेट मैदानाजवळ डिसेंबर २०२१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एका अल्पवयीन मुलीच्या संमतीशिवाय शरीरसंबंध प्रस्थापित केल्याची तक्रार कापड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे .या बालिकेने मुंबई येथे जे जे हॉस्पिटल येथे बाळाला जन्म दिला याप्रकरणी आरोपी कुंदन दाभोळकर याच्याविरोधात दाभोळ पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे