CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : श्री अग्रसेन महासभा इन्दौर च्या स्थापना दिवसा च्या निमित्ताने सिंघानिया पारमार्थिक ट्रस्ट तर्फे श्री अग्रसेन महासभा मांगलिक भवन, बायपास, इन्दौर येथे अंतरराष्ट्रीय वक्ता, कमलाबाई एजुकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष आणि ज्यांनी मुंबई च्या डबेवाला ह्या विषया वर पीएचडी केली आहे असे शिक्षण महर्षि सम्मानीय डॉ पवन गिरधारीलाल अग्रवाल यांना *लाइफ टाइम अचिव्हमेंट अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी श्री डॉ अशोक मेवाडा ह्यांना बुद्धिजीवी पुरस्कार देवून गौरविण्यात आले अणि समजाच्या 14 प्रतिभाशाली विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला.
ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे इन्दौर चे ए सी पी श्री विशेष अग्रवाल, मुंबई वृत्त पत्र संघाचे सचिव श्री भालचंद्र वाणी, अग्रसेन महासभा इन्दौर चे अध्यक्ष श्री राजेश बंसल, सचिव श्री येस एन गोयल संयोजक मोहनलाल बंसल, ट्रस्ट चे अध्यक्ष श्री विनोद सिंघानिया, सचिव विशाल सिंघानिया, निवड समिती चे प्रमुख श्री मुरली मनोहर बंसल, श्री सी ए गोविंद अग्रवाल उपस्थित होते. इतर पाहुणे श्री जगदीश अग्रवाल, हिमांशू अग्रवाल, श्रीमती नीता अग्रवाल, थाडे गोपाल हॉटेल चे मालक श्री दुर्लभ अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी ए ये एस एन गोयल, गौरव पत्राचे वाचन श्री मुरली मनोहर बंसल आणि आभार प्रदर्शन गोविंद अग्रवाल यांनी केले.