CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नौपाडा परिसरातील दिवाळी पहाट कार्यक्रमामुळे वाहतुकीत बदल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे दि. 18 (जिमाका) :- नौपाडा परिसरातील डॉ. मुस रोड ते - शंका ज्वेलर्स व देवा शर्टसच्या मार्गावर दिवाळी पहाट कार्यक्रमामुळे दि. 24 ऑक्टोबर 2022 रोजी रोजी सकाळी 06.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिला आहे.

वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे

प्रवेश बंद : डॉ. मुस चौकाकडून गडकरी सर्कलच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने डॉ. मुस चौकातून सरळ टॉवर नाका टेंभीनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : गडकरी रंगायतन जवळील सर्कल कडून डॉ. मुस चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने गडकरी सर्कल येथून अल्मेडा चौक-वंदना टी पॉईट- गजानन चौक-तीन पेट्रोल पंप- हरीनिवास सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : घंटाळी साईनाथ चौकाकडून गाडगीळ चौकाचे दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना श्रध्दा वडापाव, घंटाळी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने घंटाळी चौकातून घंटाळी देवी पथ मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : गजानन चौक ते तीन पेट्रोल पंप या सावरकर रोड वरील काका सोहनी पथ या गल्लीतून गाडगीळ चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने तीन पेट्रोल पंप-हरीनिवास सर्कल मार्गे अथवा घंटाळी रोडने इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : राजमाता वडापाव सेंटर कडून गजानन महाराज चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने राजमाता वडापाव सेंटर येथून गोखले रोडने इच्छित स्थळी जातील.

फायरब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा बदल लागू राहणार नाही, असे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

ठाणेनगर वाहतुक उपविभागाच्या हद्दीत दिपावली सणाच्या निमित्ताने वाहतुकीत बदल

ठाणे दि. 18 (जिमाका) :- ठाणेनगर वाहतुक उपविभागाच्या हद्दीत दिपावली सणाच्या निमित्ताने दि. 18 ऑक्टोबर 2022 ते दि. 26 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत दररोड 14.00 ते 23.00 वाजे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिला आहे.

वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे

प्रवेश बंद : जांभळी नाक्याकडुन बाजारपेठेत जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने ही कोर्टनाका येथुन जांभळीनाका येथे उजवीकडे वळण घेवून टॉवरनाका मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : खारकर आळीकडून बाजारपेठ जांभळी नाका कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना महाजनवाडी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने ही खारकर आळी कडुन येऊन ठामपा व्यायाम शाळा येथुन महाजन वाडी हॉल लगत उजवीकडे वळुन एन.के.टी. कॉलेज मार्गे कोर्ट नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : ठाणे ट्रेडर्स दुकानाकडून महंमद अली रोडने जांभळी नाका बाजुकडे येणाऱ्या मोटार सायकल वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने ठाणे ट्रेडर्स दुकानाकडून उजवीकडे वळुन महागिरी मशीदकडे वळुन इच्छीत स्थळी जातील.

प्रवेश बंद : दादोजी कोंडदेव स्टेडीयम कडून बाजारपेठ कडे जाणा-या सर्वप्रकारच्या वाहनांना स्टेडीयमजवळ प्रवेशबंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने अग्नीशमन कार्यालय येथून राघोबा शंकर रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : अशोक सिनेमा नॅशनल इलेक्ट्रॉनिक दुकानाकडून बाजारपेठेत जाणाऱ्या मोटार सायकल वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना अँटीटयूड दुकाना जवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदाची वाहने ही नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स दुकान येथून उजवीकडे वळून दत्त मंदिर सिडको स्टॅण्डकडून इच्छित स्थळी जातील.

पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा बदल लागू राहणार नाही, असे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.