CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे : - ठाणे येथील कै. गणेश अनंता भोईर ( वय 61 वर्षे, रा. हरिओम प्लाझा, आनंदनगर रोड, कोपरी वस्ती, ठाणे) हा इसम कब्रस्तान गेटसमोर हनुमाननगर, वागळे इस्टेट, ठाणे येथे बेशुध्द अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळून आल्याने त्यास औषधोपचारासाठी शासकीय रुग्णालय ठाणे येथे आणले असता दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मृत इसमाचे वर्णन असे :- अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, उंची 5 फूट 5 इंच, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी व मीशी वाढलेली, अंगात तपकिरी रंगाचा लहान चेक्स फुल बाह्याचा शर्ट, राखाडी रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे.या इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे.