CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे: - ठाणे येथील श्री. विनोद गिरीश आरोटे (वय 29 वर्षे, रा. साई लक्ष्मी बिल्डिंग, रुम नं. 204, ए विंग, एस.एम.जी. शाळेसमोर, दिवा आगासन रोड, बी.आर.नगर, दिवा (पूर्व), ठाणे) हा इसम हरवल्याची नोंद वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हरवलेल्या इसमाचे वर्णन असे :- रंग सावळा, चेहरा गोल,उंची 5 फूट 6 इंच, नाक सरळ, डोळे काळे, डोक्याचे केस काळे मध्यम, मिशी बारीक अंगात फिकट हिरव्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची फुल जिन्स पॅन्ट, पायात निळ्या व पांढऱ्या रंगाचे स्पोर्टस शुज घातलेला आहे.
सदर तरुण जर कोणास आढळल्यास तर त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे.