CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीत नाभिक समाज संघटनेची सुवर्ण महोत्सवी गुढी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

डोंबिवली : नाभिक समाज संघटना ई - ४४२ डोंबिवली च्या वतीने चैत्र प्रतिपदा, नववर्षारंभ, गुढीपाडवा हा सण अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला. समाज संघटनेचे हे ५० वे वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गेल्या पन्नास वर्षात न झालेली घटना या नवीन कार्यकारणी ने केली आहे. नाभिक समाजाची स्वतःची गुढी आज श्री संत सेना महाराज सभागृह, छेडा रोड , एस. वी. जोशी हायस्कूल समोर, डोंबिवली (पूर्व) या ठिकाणी उभाण्यात आली. सदर कार्यक्रमास अनेक नाभिक बंधू, भगिनींची आणि बालगोपाळांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन नाभिक समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले होते. येणारे वर्ष हे सर्व नाभिक बांधवांना उत्कर्षाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशी कामना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. क्राईम बॉर्डर चे संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे अध्यक्ष श्री. राजेंद्र वखरे आणि नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब राऊत यांच्या शुभ हस्ते गुढी उभारण्यात आली.

याप्रसंगी बोलत असताना समाज संघटनेचे सचिव श्री. मंगेश पोफळे यांनी सांगितले की डोंबिवली

या सांस्कृतिक नगरी मध्ये नाभिक समाज संघटनेची गुढी उभारणे हा महत्त्वाचा क्षण आहे. नाभिक समाज हा डोंबिवलीच्या जडणघडणीमध्ये एक महत्त्वाचा घटक असून समाज आता सांस्कृतिक-सामाजिक कार्यांमध्ये पुढाकार घेत असल्याचे हे लक्षण आहे.

याप्रसंगी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि बांधवांचे सहकार्य लाभले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती याप्रसंगी महिलांनी रांगोळी काढून पारंपारिक पद्धतीने फुगडी आणि झिम्मा खेळून

आपला आनंद व्यक्त केला. उपस्थित बालगोपाळांना खाऊ वाटप करण्यात आले. या प्रसंगी मागील वर्षभरात ज्या बांधवांच्या घरात मृत्यू झालेला आहे अशा बांधवांच्या घरी जाऊन त्यांना

नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू देऊन समाज त्यांच्या पाठीशी आहे हा विश्वास त्यांना देण्यात आला .श्री संत सेना महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.