CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कल्याण पूर्वेतील समता फेरीत 'रेकॉर्ड ब्रेक ' भिम सैनिकांचा सहभाग !खासदार डॉ श्रीकांत शिंदे,आमदार गणपत गायकवाड यांचे सह अनेक मान्यवरांनी केले महामानवाला वंदन !

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER
कल्याण - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कल्याण पूर्वेत निघालेल्या समता फेरीत या वर्षी प्रथमच रेकॉड ब्रेक भिम सैनिक सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले . गेली दोन वर्ष कोरोना महामारी मुळे खंडीत झालेला जयंती उत्सव आणि या वर्षी प्रभाग ड कार्यालय येथे संपन्न झालेल्या नियोजित आंबेडकर स्मारकाच्या पार्श्वभूमिवर या वर्षी प्रथमच समता फेरीतील भिम सागरात आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसून आले .


१२ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या स्मारक भूमिपूजन सोहळ्याचा आनंद आणि १३ एप्रिल रोजी जयंतीच्या पूर्व संध्येस प्रभाग ड कार्यालया समोर महामानवाला विभागा - विभागानून आलेल्या भिम सैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मध्य रात्री बुद्ध वंदना आणि पंचशिलेचे पठण करून मानवंदना दिली . यावेळी शिवसेना नगरसेविका सौ माधुरी प्रशांत काळे आणी शिवसेना कल्याण पुर्व विधानसभा सघंटक प्रशांत काळे यांनी प्रायोजित केलेल्या संगत थिएटर्स प्रस्तुत 'भिमा तुम्हा वंदितो ' या भिम बुद्ध गितांच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते .


१४ एप्रिल या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सायंकाळी पत्रीपुल येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकातून समता फेरीला प्रारंभ करण्यात आला . या समता फेरीत अश्वरथात स्थानापन्न केलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उत्सव समितीचे अध्यक्ष केतन रोकडे यांचे सह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्या नंतर या समता फेरीला प्रारंभ झाला . या समता फेरीत विद्यृत रोषणाईने सुसज्ज अशा सोनेरी छत्र्या, सोनेरी अश्वरथ या सह नाशिकचा बॉस बॅन्ड पथक मुख्य आकर्षण ठरला .
ही समता फेरी नेतीवली मागे, चक्की नाका, तिसगांव नाका, सिद्धार्थ नगर, गणेश मंदीर चौक, काटेमानिवली नाक्याहून प्रभाग ड कार्यालया समोर आल्या नंतर या ठिकाणी समता फेरीचा समारोप करण्यात आला . या समता फेरीत तिसगांव, विजय नगर, सिद्धार्थ नगर, डबल टॉवर, जुनी जनता सहकारी बँक, विनायक कॉलनी या परिरातून निघालेल्या रॅली मार्गात सहभागी झाल्याने या समता फेरीला अंतिमतः भव्य दिव्य स्वरूप येउन प्रभाग ड कार्यालय येथे 'भिम सागर ' लोटल्याचे या वर्षी प्रथमच दिसून आले .या रॅलीच्या मार्गात संतोषनगर येथे पेय जलाची व्यवस्था केली होती तर दादासाहेब महाले यांनी प्रसादम हॉटेल येथे वडा पाव वाटप केले .


तिसगांव नाक्यावर समता फेरीच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले होते . या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कलात्मक मंचावर आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या हस्ते समता फेरीत सहभागी संस्था - संघटना - लोकप्रतिनीधी तसेच मान्यवर व्यक्तींचा सन्मान चिन्ह देउन सन्मान करण्यात आला, या ठिकाणी कल्याण जनता सहकारी बँकेचे संचालक हेमंत दरगोडे यांनी समता फेरीचे स्वागत करीत महा मानवाला वंदन केले .

तिसगांव नाक्यावर वतीने लाडूचे वाटप करण्यात आले . समता फेरी तिसगांव रोड वरून पुढे जात असतांना शिवसेना शाखे समोर खासदार डॉ . श्रीकांत शिंदे, हर्षवर्धन पालंडे, आदी मान्यवरांनी शिवसेनेच्या वतीने समता फेरीचे स्वागत करीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली . विवेक जगताप यांच्या निवासस्थानी या समता फेरीचे फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले . कोळसेवाडी शिवसेना शाखेसमोर धनराज पाटील, आदी मान्यवरांनी समता फेरीचे स्वागत केले .मोठ्या जल्लोषात निघालेल्या या समता फेरीत अनेक मान्यवर सहभागी झाले होते .प्रभाग ड कार्यालया समोर जयभिम च्या घोषणांसह समता फेरीची सांगता करण्यात आली .