CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) :१ मार्च २०२० रोजी डाॅ शाल्मली डायलिसिस सेंटरचे उदघाटन डाॅ. स्नेहलता देशमुख यांचे शुभहस्ते झाले. डाॅ.सुनिल व वर्षा खासबारदार व त्यांचे नातेवाईक यांनी डाॅ.शाल्मली खासबारदार फाऊंडेशनच्या माध्यमातून 6 डायलिसिस मशिन आश्रय चॅरिटेबल हाॅस्पीटल मधे दिले.
१ मार्च २०२१ रोजी वर्षपूर्ती निमित्त रु.५००००/ चा धनादेश या फाऊंडेशन तर्फे देण्यात आला. डायलिसिस पेशंटना नीला व रोहिणी जोडणाऱ्या नाजुक ऑपरेशन साठी लागणारी साधन सामुग्रीसाठी ह्या देणगीचा वापर करण्यात येणार आहे.
श्री.व सौ हर्डीकर व डाॅ. राहुल पालशेतकर तसेच आश्रय टृस्टचे सेक्रेटरी श्री हेगडेसाहेब व श्री. शेखर चिटणीस व आश्रयचे सभासद यावेळी हजर होते. डायलिसिस टेक्निशियन श्री. योगेंद्र सावंत व त्यांच्या सर्व टेक्निशियन चा सत्कार करण्यात आला.
आश्रयच्या ह्या आधुनिक सोयींनी युक्त अशा सेंटरला याप्रसंगी डाॅ स्नेहलता देशमुख यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या व खासबारदार कुटुंबीयांचे कौतूक केले.
आश्रय चॅरिटेबल हाॅस्पीटल, अभिनव बॅन्केजवळ, एम आय डी सी तिल या सेंटरमधे एकूण १४ मशिन असून दरमहा ६०० डायलिसिस होतात व २५ जणांना आर्थिक सूट देण्यात येते.आश्रयचे अध्यक्ष डाॅ.अरुण पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.