CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) : संजीवनी आदिवासी ग्रुप तर्फे दुर्गम भागातील २४ आदिवासी शाळा दत्तक घेण्यात आल्या असून. या मुलांना शहरातील मुलासारख्या सर्व सोयी उपलब्ध केल्या गेल्या आहेत. या सर्व शाळा संगणक युक्त आहेत.
महेश पाटील यांनी अकरा हजार रुपयाची देणगी दिली असून ती देणगी अभिजित मिरजकर यांनी ग्रुप तर्फे स्वीकारली.महेश व मनाली पाटील यांच्या लग्नाचा सत्ताविसावा वाढदिवस आहे ,यानिमित्ताने त्यांनी आदिवासी मुलांसाठी हे देणगी दिल्याचे डॉ. अरुण पाटील यांनी कळविले आहे.
सामाजिक उपक्रमात डोंबिवलीतील संजीवनी आदिवासी ग्रुप अग्रेसर आहे. डॉ. अरुण पाटील यांनी खूप मोठा जोडला आहे.