CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात देशी बनावटीची ४ गावठी अग्निशस्त्र आणि ८ जिवंत काडतूसासह ३ जणांना केले चतुर्भूज

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

crime border news network

डोंबिवली : दोन व्यक्ती बेकायदेशीररित्या गावठी अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील सिडको बस स्टॉप येथे सापळा रचून तालीव सदाकत अली अन्सारी (वय २०) आणि इम्रान मो. इरफान अन्सारी (वय १९) यांना २ गावठी बंदुक आणि ६ जिवंत काडतुसांसह अटक करण्यास मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

अन्सार मो. अजीज सलमानी (वय १९) याला अटक करून त्याच्याकडून २ गावठी अग्निशस्त्र आणि २ जिवंत काडतुसे हस्तगत करण्याची कारवाई केली. तिन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने ६ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर तालीव सदाकत अली अन्सारी (रा. जि. बदायू, रा. उत्तर प्रदेश) व इम्रान मो. इरफान अन्सारी (वय १९ रा. जि. बदायू, रा. उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी सापळा रचून ठाणे सिडको बसस्टोप येथून अटक केली. त्यांच्याकडे दोन गावठी अग्निशस्त्र आणि ६ जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

त्यांना न्यायालयात नेल्यानंतर ६ जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.आरोपी तालीव अन्सारी याच्या अधिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाच्या पथकाने अन्सार मो. अजीज सलमानी (वय १९ वर्षे रा. जि. बाराबंकी, रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत २ देशी अग्निशस्त्र आणि २ जिवंत काडतुसे पोलीस पथकाने हस्तगत केली. त्यालाही न्यायालयाने ६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. ठाणे गुन्हे शाखा मालमत्ता विभागाच्या पथकाने तीन आरोपींसह चार गावठी अग्निशस्त्र आणि ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्याची धडक कारवाई केली.

या गुन्ह्यासंदर्भात पोलीस आयुक्त जय जीत सिंह सह आयुक्त दत्तात्रय कराळे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मरोळे ,डीसीपी गुन्हे लक्ष्मीकांत पाटील ,एसीपी अशोक राजपूत ,(शोध -२)यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे कक्षाचे वपोनि. अनिल होनराव यांच्या नेतृत्वाखाली एपीआय महेश जाधव एएसआय स्वप्नील प्रधान ,पो. हवा .राजेंद्र घोलप/३१८७ , करळे /२२७४,जाधव/२९२८,शिंदे/११९७,पो.ना. भामरे/३३७४,bhurke ५६७,तसेच पोलीस हेड क्वार्टर ठाणे शहर नेमणुकीतील एएसआय अंकुश भोसले पो.हवा. दत्ता भोसले ५३८९ या पथकाने परिश्रम घेतले