CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील साई बाळाराम कंपलेक्स जवळ असलेल्या खंडोबा मंदिर रिक्षा स्टँड ची सत्यनारायण पूजा संपन्न दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपन्न झाली.सन २०२१ मध्ये या रिक्षा स्टँड ची स्थापना करण्यात आली या ठिकाणी जवळपास शंभर रिक्षा प्रवाशांसाठी आहेत. प्रथमच या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती.येथील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आमचं उद्धीष्ट आहे कि, प्रवाशांना चांगली सेवा देणे कसून एक वेगळा आदर्श या रिक्षा स्टॅन्डचा चालक म्हणून झाला पाहिजे कोणतीही चांगली घटना घडली तर तो चालक याच रिक्षा स्टॅंडचा असेल सर्व रिक्षा चालक-मालक हे एक सामाजिक उपक्रम राबवतील त्यामध्ये
मेडिकल कॅम्प लावून आरोग्य तपासणी असे व विविध प्रकारचे शिबीरं व लहान मुलांच्या मिनी स्पर्धा घेऊन त्यांच्यातली खेळाडू वृतीला वाव देण्याचा मानस आहे.
तसेच असा एक निधी जमा कराचा आहे कीं तो पूर ग्रस्त किंवा आपत्कालीन वेळेस अडचणीत असलेले रिक्षा चालक किंवा नागरिक यांना मदत करता येईल हा रिक्षा स्टॅन्ड बनवण्या मागे संतोष वरकुटे यांचे फार मोठे योगदान आहे .दिवसरात्र एक करुन हा रिक्षा स्टॅन्ड बनवला आहे.खूप अडचणी आल्या खूप विरोध झाले.पण या सर्वावर मत करून हा स्टॅन्ड अस्तित्वात आला.या कामी आम्हाला केडीएमसी चे मा. सभापती विकास गजानन यांनी सहकार्य केले.
अध्यक्ष चरण भोईर यांनी खंबीर पणे उभे राहून आमचं मनोबल वाढवलं अमित पाटील, येऊश भोईर प्रकाश भोईर यांनी दिलेली सर्व जवाबदारी अगदी चोख पणे पर पडली म्हणून आजचा कार्यक्रम व्यवस्थित पर पडला.सूत्र संचालन संतोष वारकुटे यांनी केले तर अथितींचा सत्कार शैलेश भोईर, विनोद भोईर,अरविंद म्हात्रे यांनी केले.