CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने ७५ वा अमृतमहोत्सव साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (रामेश्वर काळे) : घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाटकर रोड कामत मेडिकल समोर लादीनाका येथे मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण डोंबिवली विभागाचे ACP सुनिल कुराडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी शासकीय अधिकारी डोंबिवली रामनगर पो.स्टे.चे वपोनिरी. सचिन सा॑डभोर,टिळकनगर पोलीस स्टेशन चे वपोनिरी.अजय आफळे,मानपाडा पो.स्टे.चे वपोनिरी.शेखर बागडे,विष्णूनगर पो.स्टे.चे वपोनिरी. पंढरीनाथ भालेराव साहेब ,डोंबिवली वाहतूक शाखेचे वपोनिरी. उमेश गिते ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेश कदम , न्यु फोर्स अकॅडमी चे संचालक शेख सर, रनर स्कॅन ग्रुपचे संचालक, लक्ष्मण गु॔डप , माणिक उघडे ,रिपब्लिकन पार्टीचे नेते अजय पौळकर ,काँग्रेस पार्टीचे नेते श्री. गणेश चौधरी, सौ. सुलेखा गटकळ व सौ. मनिषा सुर्वे ताई , हिरकनी महीला ग्रूप व उपस्थित सर्व भगिनी वर्ग व सर्व नाका कामगार बंधु भगिनी व मान्यवर यांच्या सर्वांच्या उपस्थिती व सघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माणिकराव मिसाळ, नामदेव भानुसे ,युवा अध्यक्ष रामेश्वर शेजुळ, नाका अध्यक्ष राणा शेठ, कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष केशव मिसाळ, युवा अध्यक्ष डोंबिवली ,सौ. वंदना जाधव महीला डोंबिवली शहर अध्यक्ष नवनाथ मोरे ,डोंबिवली शहर अध्यक्ष या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ. प. रामेश्वर काळे (महाराज) यांनी केले.

या कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते ,पत्रकार बांधव पोलीस अधिकारी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागाने संघटनेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशस्वीरित्या संपन्न केल्या बद्दल संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.