CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर घडणाऱ्या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेऊन प्रभावीपणे पायबंद करणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. २७: ऑगस्ट रोजी तीन वाजून वीस मिनिट ते चार वाजून पंचवीस मिनिट वाजता च्या दरम्यान लेनिट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड परमार इंडस्ट्रियल स्टेट वसई फाटा जवळ नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे फिर्यादी नामे मनोज राणे वय 40 वर्ष धंदा नोकरी राहणार प्रेम वल्लभ हॉल जवळ आगाशी रोड विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर यांचे लेणीत एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आठ इसमानीं प्रवेश करून वाचमेन यांना मारहाण करून त्यांचे जबरदस्तीने हातपाय बांधून ठेवले.
त्यानंतर आयशर कंपनीचा टेम्पो गेटमध्ये घेऊन त्यात त्यांनी गोडाऊन मधील ठेवलेले स्टेनलीस स्टीलचे रोड किंमत तीन लाख 78 हजार रुपये असा माल आयशर टेम्पोमध्ये भरून जबरी चोरी करून निघून गेले होते. त्याबाबत पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 727 / 2022 भारतीय दंड विधान संहिता कलम 395, 341 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध होण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष ३, विरारचे पोलीस पथकाने वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीत यांचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती प्राप्त करून गुन्हा घडल्याच्या 36 तासाच्या आत सापळा रचून आरोपीत नामे १) बद्री आलम मेहमूद अली खान वय 36 वर्ष , २) इर्शाद शौकत अली वय 54 वर्ष , ३) मोहम्मद रफीक इद्रिस शहा 27 वर्ष ,४) मोहम्मद रफीक शेख व ३७ वर्ष , ५) मजहर इरशाद अली खान 21 वर्ष , ६) नजीर अहमद सोराब अली शेख वय ४० वर्ष ,७) हाफिजउल्ला ईदउल्ला खान 29 वर्ष यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे प्राथमिक तपासात त्यांचा सदर गुन्ह्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाला असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांपैकी आरोपीत नामे बद्री आलम मेहबूब आलेख खान वय 36 वर्ष याचे वर यापूर्वी नाशिक व ठाणे जिल्ह्यात अशाच प्रकारे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीत यांना पकडणे कामी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष ६ चे पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांचे पथकाने तात्काळ मदत पुरविली . वरील आरोपी यांनी अशाच प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असून यांना पुढील कारवाई करिता पेल्हार पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्यासंदर्भात विजयकांत सागर , पोलीस उपयुक्त (मुख्यालय), अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे ,सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि . भा . वि . व. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पो. उप. निरी. शिवाजी खाडे ,उमेश भागवत ,पो. हवा. अशोक पाटील, मनोज चव्हाण ,मुकेश तटकरे, शंकर शिंदे ,सचिन घेरे, सागर बारवकर ,पोलीस नाईक , पो. शि . मनोज सकपाळ, राकेश पवार ,अश्विन पाटील ,सुमित जाधव सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे