CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Live in a Relationship - कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील एका चाळीत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या विधवा महिलेचा निर्घृण हत्या

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

Live in a Relationship - कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील एका चाळीत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या विधवा महिलेचा निर्घृण हत्या , अनिल भातसोडे,विठ्ठलवाडी पोलीसांच्या रडारवर आरोपी नौ ,दो, ग्यारह कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात असलेल्या एका चाळीत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या विधवा महिलेची निर्घृण हत्या ( Murder of a Widow) तिच्या ३६ वर्षीय प्रियकराने भिंतीवर डोके आपटून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( Live in a Relationship ) राहत होते.अनिल भातसोडे , विठ्ठलवाडी पोलीसांच्या रडारवर

याप्रकरणी ( Vitthalwadi Police Station ) विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. अनिल भातसोडे, वय ३६ वर्षे, रा. चिंचपाडा, कल्याण असे खून करून पसार झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर सुकन्या आव्हाड, असे खून झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे.मयत सुकन्या ही तिच्या १७ वर्षीय मुलीसोबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात राहात होती. उदरर्निवाहसाठी दोघी माय लेकी केटरर्सचा व्यवसाय करत होत्या.तर सुकन्या हिच्या पतीचे ७ वर्षांपूर्वी निधन झाले होते, या दरम्यान आरोपी अनिलशी मृत विधवा महिलेची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये सूत जुळल्याने ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये लग्नावरून वाद झाला. त्यानंतर तो मृत महिलेला बाहेर भेटायला बोलावयाचा आणि तिच्याकडे पैशाची मागणी करायचा याच वादातून दि. १५ मार्च) मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर उभ्या केलेल्या रिक्षात मुलगी मोबाईल बघत होती. तेव्हा तिला तिच्या आईचा ओरडण्याचा व भांडे पडल्याचा आवाज आला. तिने खिडकीतून आत पहिले असता आरोपी अनिल भातसोडे हा तिच्या आईला लाथा बुक्कीने मारत तिचे डोके भिंतीला आपटत होता. त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.त्यावेळी आरोपी घरातून पळून जात असताना मुलीने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्याचा यशस्वी झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला व अनिल भातसोडे हे काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. मात्र, काही कारणास्तव ते मागील तीन महिन्यापासून वेगळे राहत होते , पण अनिल हा सुकन्या हिला बाहेर बोलावून घेऊन जात होता. महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून आरोपी अनिल भातसोडे याचा विठ्ठलवाडी पोलीस कसून शोध घेत आहेत .