CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छिमार तरुणांसाठी वसई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये दि. 01 जुलै 2022 पासून सहा महिने कालावधीचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण सुरु होणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी 31 जून 2022 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अजिंक्य पाटील यांनी केले आहे.या वर्गामध्ये मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मुलत्तत्वे, सागरी डिझेल इंजिनाची निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थीकडून 450 रुपये व दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
या प्रशिक्षणाकरीता उमेदवार किमान चौथी उर्तीर्ण व 18 ते 35 वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात मच्छीमार संस्थेच्या शिफारसपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, दोन छायाचित्रांसह दि. 31 जून 2022 पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात तसेच वसईमधील वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था इमारत, पाचुबंदर, वसई ता. वसई येथे पाठवावेत. अधिक माहितीसाठी वसई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अजिंक्य पाटील (मो. न 9892103235) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.