CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे : - उल्हासनगरमध्ये दि.24 ऑगस्ट 2022 रोजी सिंधी बांधवांचा चालिया सणाची सांगता होणार असून त्या निमित्ताने झुलेलाल मंदिर उल्हासनगर नं.1 ते हिराघाट उल्हासनगर नं.3 पर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत होण्याकरीता उल्हासनगरमधील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविली आहे.
प्रवेश बंद :- झुलेलाल मंदिर चौक-सादुबेला चौक-भारतचौक-शिरु चौक-नेहरु चौक-लिंक रोड-न्युईरा चौक-शिवाजी चौक –पवई चौक- हिराघाट- शास्त्री चौक या मिरवणुका मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पवई चौक पर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली असून या मार्गावर प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :-
(1) झुलेलाल मंदिर चौक - झुलेलाल मंदिर मार्ग - भारत चौक- गोल मैदान- तसेच बिर्लागेट व इतर ठिकाणी जाणारी वाहतूक ही झुलेलाल चौक येथून खेमाणी, मच्छिमार्केट मार्गे इच्छित स्थळी जातील.
(2) उल्हासनगर वा. उप शाखा कार्यालय समोरील चौक येथून भारत चौक मार्गे, खेमाणी- धोबीघाट-झुलेलाल चौक मार्गे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना उल्हासनगर वाहतुक उप विभाग कार्यालय येथून ओटी नं.1 मार्गे बाबा बसंतराम दरबार मच्छिमार्केट मार्गे इच्छित स्थळी जातील.
(3) भारत चौक मार्गे गोल मैदान नेहरु चौक बाजूकडे जाणारी वाहतूक ही मच्छिमार्केट तसेच बाबा बेफिक्री चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
(4) नेहरू चौक मार्गे शिरु चौक तसेच खेमाणीकडे जाणारी वाहतुक ही मच्छिमार्केट व भारत चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
(5) शिवाजी चौकात अंबरनाथ कल्याण रोडने कल्याणकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही फॉलवर लाईन मार्गे जवाहर हॉटेल - नेहरू चौक-गोल मैदान-मधुवन चौक-गुरूद्वारा चौक-शांतीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
(6) तसेच कल्याण अंबरनाथ रोडने अंबरनाथ दिशेने जाणारी वाहतुक ही होंडा शोरुम येथे डावीकडे वळुन डॉल्फीन क्लब - गुरुद्वारा चौक-मधुबन चौक-नेहरु चौक- जवाहर हॉटेल-फॉलवर लाईन मार्गे इच्छित स्थळी जातील.
सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 ते 22.00 वा. पावेतो अमलात राहिल. सदरची अधिसूचना पोलीस वाहने, फायरब्रिगेड, रुग्णवाहीका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उप आयुक्त श्री. कांबळे यांनी कळविले आहे.