CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे उपविभागाअंतर्गत ७१४ अकस्मात मृत्यूची चौकशी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे दि .२ फेब्रु. २०२१ : ठाणे उपविभागाअंतर्गत ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिका असुन ठाणे महसूल उपविभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांचेकडून माहे जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेर पर्यंत एकुण ७१४ प्रकरणे या कार्यालयात अकस्मात मृत्यु नोंद झालेली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये सदर व्यक्तींच्या मृत्युच्या दर्शनी कारणांचा अहवाल संबंधीत पोलीस विभागाकडुन या कार्यालयास प्राप्त झाला असुन त्याबाबत चौकशी सुरु आहे. त्यानुसार त्यांचेकडील प्राप्त प्रकरणांनुसार ७१४ मयत इसमांची यादी (जाहिरनामा) मयतांच्या मृत्यूचे कारण व अकस्मात मृत्यू समरी नोंद, पोलीस स्टेशनचे नाव व मृत्यूचा प्रकारासह खालील कार्यालयांमध्ये प्रसिध्द करणेत आलेली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे संकेतस्थळावर (www.thane.nic.in) उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, ठाणे पत्ता- २१७, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे तहसिलदार कार्यालय, ठाणे पत्ता - जिल्हा परिषद ठाणे समोर, स्टेशन रोड ठाणे, सदर मयत इसमांच्या मृत्यूच्या कारणाबाबत फौजदारी प्रकिया संहिता, १९७३ चे कलम १७६ (२) नुसार मयत व्यक्तीचे मृत्युचे कारण दर्शविणारे आदेश व चौकशी करणे प्रस्तावित आहे.

मयत इसमांच्या मृत्युबाबत/कारणाबाबत त्यांचे नातेवाईक, हितसंबंधित अथवा अन्य कोणासही संशय/तक्रार/हरकत असल्यास याबाबतचे म्हणणे किंवा त्याबाबतचे पुरावे/साक्ष देणेची असल्यास संबंधितांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्या पासुन ०७ दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी ठाणे विभाग ठाणे, पत्ता- २१७, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे कार्यालयीन वेळेत हजर राहुन आपले म्हणणे तोंडी अथवा लेखी स्वरुपात सादर करावे असे आवाहन ठाणे विभाग उपविभागीय दंडाधिकारी अविनाश शिंदे यांनी केले आहे.