CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद बुद्रुक येथे शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा : मागण्या मान्य न झाल्यास ०१ जानेवारी २०२६ ला उपोषण

CRIME BORDER | 26 December 2025 | 02:40 PM

बेटावद बुद्रुक येथे शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा : मागण्या मान्य न झाल्यास ०१ जानेवारी २०२६ ला  उपोषण

बेटावद बुद्रुक (क्राईम बॉर्डर टीम) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या बेटावद बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी नुकतीच जामनेरचे तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात शेतकरी हिताच्या मागण्या मंजूर करण्याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.  निवेदनात त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मंजूर न झाल्यास सर्व शेतकरी बेटावद  बुद्रुक येथील शिवतीर्थावर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 


शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने मागण्या पुढील प्रमाणे आहेत .

गाव तेथे हमी भाव केंद्र स्थापन करणे गाव ,प्रधानमंत्री किसान आणि नमो सन्मान या दोघी योजनांचा लाभ पती व पत्नी दोघांना मिळणे, शेतकऱ्यांना दरमहा एक ठराविक रक्कम मानधन म्हणून मिळणे, शेतीचे सर्व मजुरीचे काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावी . अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या असून सदर मागण्या मान्य न झाल्यास दि. ०१ जानेवारी २०२६ पासून शिवतीर्थ बेटावेद  बुद्रुक येथे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


सदर निवेदन दि. १८ डिसेंबर  २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या वतीने सुभाष नारायण ठोंबरे यांनी दिले असून निवेदनांवर खालील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत त्यात.  शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून डॉ.  प्रशांत भीमराव पाटील, गुरुदास कन्हेरकर  , सुभाष भाऊ ठोंबरे ,दीपक भाऊ कदम, अरुण दादा सुरवाडे ,अनिल भाऊ मोझे , ज्ञानेश्वर कुचेकर, किसान थोरात, सुभाष धनगर, पंडित सुरासे, अशोक ढगे, समाधान लंके ,पुरुषोत्तम ठोंबरे, सुभाष परदेशी, अंबादास पाटील, अरुण पारदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिलीप कोळपे सर व तालुका अध्यक्ष किशोर पाटील सर यांनी सुद्धा निवेदन देतेवेळी उपस्थिती दर्शवली.