CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (बापू वैद्य): डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजुलाच असलेल्या शिवाजीराव वाटवे या इमारतीच्या तळ मजल्यावर रिस्पॉन्स या नावाने कपडे विक्रीचे दुकान आहे. या दुकानाला अचानक दुपारी १ वाजल्याच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात कपडे व लाकडी शोकेस असल्याने या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले.
३ ते ४ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी ...
आगीची घटना पाहताच कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी अरुण जगताप आणि मिलिंद गायकवाड यांनी डोंबिवली अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. त्यांनतर लागलीच डोंबिवली अग्निशमन आणि शेजारील शहरातील ४ अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दुसरीकडे आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करून मोबाईल वर छायाचित्रे काढण्यात दंग होते. या गर्दीला हटविण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले. मात्र या भीषण आगीत शेजारील सुवर्णा नॉवेलटी, आणि दीप्ती यनएक्स साडी या दुकानांचे ही मोठे नुकसान असून या आगीत दुकानात लगत असलेल्या एका मोचीच्या टपरीला झळ बसून त्याचे नुकसान झाले आहे.
लॉकडाऊनमुळे दुकानाने बंद
लॉकडाऊन मुळे दुकानाचे बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील लाखो रुपयांचे कपडे व साहित्य जळून खाक झाली आहे. ही आग शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सध्या घटनस्थळी कुलिंगचे काम सुरु आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक साई प्रिया नावाचा हॉल आहे. तळ मजल्यावरील दुकानांच्या आगीची झळ पहिल्या मजल्यापर्यत गेल्याने काही प्रमाणात हॉलचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.