CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी क्लब तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष रोटेरियन एडव्होकेट कैलाश सोनवणे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीचे अध्यक्ष रोटेरीयन कार्तिक अय्यर व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली क्राउन सिटीचे अध्यक्ष रोटेरीयन विनायक गुर्जर यांनी वृक्षारोपण मोहिमेस पुढाकार घेतला ज्यात जिल्हा ३१४२ झोन ६ चे इतर ७ रोटरी क्लब्स चा समावेश होता.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष रोटेरीयन संजीव तांबे, रोटरी क्लब ऑफ रीजेंसी इस्टेटच्या अध्यक्षा हिना मनसेटा, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनीच्या अध्यक्षा रोटेरीयन राधिका कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्सचे अध्यक्ष डॉ. अनिल रत्नाकर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटीचे अध्यक्ष निशांत व्यास,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊनचे अध्यक्ष गोपाल दुबे, आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली नॉर्थचे अध्यक्ष रोटेरीयन शरद सेठ यांनी यात सहभाग घेतला.

डोंबिवलीच्या हद्दीत उंबरली हिल्स येथे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. रोटेरीयन किशोर आढाळकर हे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे प्रकल्प प्रमुख होते. त्यांचे सहकारी संदिप म्हस्कर,गुणवंत पाटील व प्रसाद आगवेकर यांची मोलाची साथ लाभली.

रोटरी जिल्हा ३१४२ चे चीफ को-ऑर्डिनेटर रोटेरीयन मिलिंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शनपर भाषण केले व रोपटेही लावले. गट संयोजक योगेश खडके आणि नवीन क्लब सल्लागार मिलिंद मोहिते याप्रसंगी उपस्थित होते आणि या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

या मोहिमेत वरील क्लबमधील जवळजवळ ६० रोटरियन उपस्थित होते आणि सामाजिक अंतराचे मानदंड पाळून व आणि चेहर्यावर मुखपट्टी लावून हा प्रकल्प करण्यात आला.

रोटरी जिल्हा ३१४२ चा १ ‌जुलैच्या रक्तदान शिबीर मोहिमेनंतर आणखी एक यशस्वी संयुक्त प्रकल्प, DS डॉ. माधव बाइतूले आणि AG के. सुब्रमण्यन यांच्या अंतर्गत झोन ६ ने पार पाडला व वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले.

यावेळी गेल्या वर्षी लावलेले वृक्ष हे जवळ जवळ ४ ते ५ फूट ऊंच वाढलेले पाहून सगळ्यानी समाधान व्यक्त केले. तसेच यावर्षी लावलेल्या वृक्षांचे ही नीट संगोपन करण्याचे आश्वासन प्रेसिडेंट कैलाश यांनी दिले.